Samarjeetsinh Ghatge : ...त्यांचा आणि माझा संबंध संपला! समरजित घाटगे यांच्याकडून एक घाव दोन तुकडे...

Assembly Election Hasan Mushrif Kagal Constituency : भाजप नेते समरजित घाटगे त्यांचे बंड अटळ मानले जात असून ते तुतारी हाती घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Samarjeet Ghatge
Samarjeet GhatgeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांचा सन्मान मेळावा पार पडत आहे. महायुतीचे सर्वच प्रमुख नेते या मेळाव्यासाठी कोल्हापुरात दाखल होणार आहेत. तत्पूर्वी महायुतीला खिंडार पडले असून राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला आहे. तर भाजप नेते समरजित घाटगे त्यांचे बंड अटळ आहे.

घाटगे या मेळाव्याला उपस्थिती लावणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यावर घाटगे यांनी एका शब्दात उत्तर देत या मेळाव्याला उपस्थित राहणार की नाही? याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. या मेळाव्याबाबत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी विनंती केल्यानंतर समरजित घाटगे यांनी एका शब्दात उत्तर देत तुतारी फुंकण्यावर ठाम राहत असल्याचे सांगितले आहे.

Samarjeet Ghatge
Kolhapur Politics : फडणवीस-पवार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कोल्हापुरात कसोटी, मेळाव्यात नाराजांची उपस्थिती ठरवणार महायुतीचं भवितव्य

हसन मुश्रीफ यांची उमेदवारी घोषित करून महायुतीनेच एक प्रकारे संदेश दिला आहे की, माझा आणि महायुतीचा संबंध संपला. त्यामुळे आज होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहण्याचा प्रश्नच येत नाही, अशा स्पष्ट शब्दांत समरजित घाटगे यांनी महायुतीबद्दल बोलून दाखवले आहे.

मी आता खूप पुढे गेलो आहे मागे येणं शक्य नाही. मला जनतेतूनच आमदार व्हायचं आहे. त्यामुळे माझ्या विरोधात कितीही एकवटले तरी परिवर्तन होणार, असा स्पष्ट इशारा काल रात्री भेटीसाठी गेलेल्या भाजपच्या शिष्टमंडळाला समरजित घाटगेंनी दिला आहे.

Samarjeet Ghatge
Bjp News : भाजपच्या शिष्टमंडळाकडून समरजितसिंह घाटगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न

शुक्रवारी घाटगे गटाचा मेळावा

दरम्यान, भाजप मधून बंड पुकारण्याच्या तयारीत असणारे समरजित घाटगे येत्या 3 सप्टेंबरला राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांनी याबाबत अजून स्पष्टीकरण दिलेले नाही. तत्पूर्वी कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी उद्या शुक्रवारी कागल येथे मेळावा आयोजित केला आहे. त्या मेळाव्यात पक्ष प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com