-हेमंत पवार
Karad NCP News : ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar यांची माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुंबईत भेट घेतली. निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती सातारा जिल्ह्याच्यावतीने केल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. दरम्यान, उद्या (शुक्रवारी) पक्षाध्यक्ष पदाबाबतच्या निर्णयासंदर्भात समितीच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी बाळासाहेब पाटील Balasaheb Patil आज मुंबईला रवाना झाले.
'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच झाले. त्याप्रसंगी श्री. पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर पक्षात घडामोडी सुरू झाल्या. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील त्याच दिवशी दुपारी तातडीने मुंबईला रवाना झाले.
बुधवारी त्यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पवारांची निवृत्ती ही धक्कादायक असून त्यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पक्षासाठी कार्यरत राहावे, अशी विनंती आमदार पाटील यांनी पवार यांना सातारा जिल्ह्याच्यावतीने केली. दरम्यान मतदारसंघातील कामानिमित्त रात्री आमदार पाटील हे आज परत आले.
दरम्यान अध्य़क्षपदाच्या निर्णयासंदर्भात विचार करण्यासाठी पवारांनी सुचवलेल्या समितीची बैठक उद्या (शुक्रवारी) मुंबईत होत आहे. आज आमदार पाटील यांना मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून उद्या होत असलेल्या बैठकीस उपस्थित राहण्याबाबत निरोप देण्यात आला. त्यामुळे आमदार पाटील हे आज दुपारी पुन्हा मुंबईला रवाना झाले आहेत. उद्या ते मुंबई येथील पक्षाच्या समितीच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.