-हेमंत पवार
Maharashtra Election Result 2023 : कऱ्हाड (जि. सातारा ) तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. त्यामध्ये कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. १२ पैकी आठ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळवला आहे.
कऱ्हाड तालुक्यातील Karad Taluka बारा ग्रामपंचायतींची मतमोजणी सोमवारी सकाळी प्रशासकीय इमारतीत तहसीलदार विजय पवार यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी कऱ्हाड उत्तरमधील सर्वच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार बाळासाहेब पाटील Balasaheb Patil समर्थकांच्या पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले.
कऱ्हाड दक्षिणेतील चार ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायतींवर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसचे युवा नेते उदयसिंह पाटील यांनी आपली सत्ता कायम ठेवली आहे, तर भाजपचे नेते अतुल भोसले यांनी रेठरे बुद्रुक येथील भाजपची सत्ता कायम ठेवत सर्वच अठरा जागांवर विजय मिळवला आहे.
कऱ्हाड दक्षिणमधील तीन ग्रामपंचायतीत काँग्रेसने यश मिळवले असून, भाजपला केवळ एका ग्रामपंचायतीत विजय मिळवत आला आहे. आजच्या निकालात कराड तालुक्यात खासदार शरद पवार गट राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचे वर्चस्व पाहायला मिळाले असून, महाविकास आघाडीची ताकत कायम असल्याचे चित्र आहे.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.