Karad Maratha Reservation : कऱ्हाडला बॅनरवर चढून युवकांची घोषणाबाजी; सामूहिक आत्महत्येचा इशारा

Manoj Jarange Patil मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कराडला मोर्चाचे आयोजन केले होते.
Maratha Andolan karad
Maratha Andolan karadsarkarnama
Published on
Updated on

Karad Maratha Andolan : मराठा क्रांती मोर्चा संपल्यानंतर तीन युवकांनी दत्त चौकातील उंचावरील बॅनरवर चढून घोषणा देत खाली उतरण्यास नकार दिला. त्यावेळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप करत त्यांना खाली उतरवल्याने अनर्थ टळला. दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांना काही बरे-वाईट झाले, तर मराठा समाजातील युवक सामूहिक आत्महत्या करतील. त्यास सरकारच जबाबदार राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

मराठा समाजाला आरक्षण Maratha Reservation मिळावे आणि मनोज जरांगे पाटील Jarange Patil यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कराडला मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चा संपल्यानंतर भूषण जगताप, गणेश पवार आणि विक्रम गायकवाड या मराठा समाजाच्या तीन युवकांनी दत्त चौकातील उंचावरील बॅनरवर चढून घोषणा देण्यास सुरुवात केली.

त्यानंतर त्यांना मराठा समाजाच्या समन्वयकांनी आणि पोलिसांनी खाली उतरण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी खाली उतरण्यास नकार दिला. त्यानंतर तातडीने मराठा समाजाचे काही समन्वयक आणि पोलिस उपधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस उपनिरीक्षक राजू डांगे व काही पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. Maharashtra Political News

त्यांनी हस्तक्षेप करत संबंधित तिघांना खाली उतरले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेचे नेते फक्त मराठा समाजाला आरक्षणासाठी झुलवत ठेवत आहे, असा आरोप भूषण जगताप यांनी केला. सर्वच पक्ष आम्ही आरक्षण देऊ असे म्हणतात, मात्र, कोणीही ते देत नाही. त्यासाठी जरांगे पाटील सहा दिवसांपासून उपोषण करत असून, त्यांचे काही बरे वाईट झाले तर मराठा समाजातील युवक सामूहिक आत्महत्या करू. त्याला सरकारच जबाबदार राहील, असा इशारा दिला.

Edited By : Umesh Bambare

Maratha Andolan karad
Satara News : मराठा आरक्षणाची मागणी गांभीर्याने घ्या; माथाडी संघटना महाराष्ट्राचे अन्नधान्य बंद करेल : शशिकांत शिंदे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com