Ganesh Sugar Factory : जिल्हाभर हुंदडणाऱ्यांना मला पाहुणा कलाकार म्हणण्याचा अधिकार नाही; थोरतांचा विखेंवर पलटवार

Balasaheb Thorat and Radhakrishna Vikhe Patil : 'गणेश'ला संगमनेर आणि संजीवनी कारखान्यांसारखे चालवणार
Radhakrushna Vikhe Patil, Balasaheb Thorat
Radhakrushna Vikhe Patil, Balasaheb ThoratSarkarnama

Ahmednagar News : गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीनिमित्त महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमने-सामने ठाकले आहेत. त्यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाने अहमदनगर जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघत आहे. त्यामुळे गणेश कारखान्याच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

आपल्या पॅनलच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी थोरांतवर बोचरी टीका केली होती. ते म्हणाले होते, " या कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त आलेल्या पाहुण्‍यांचा डोळा फक्त या भागातील उसावर आहे. आम्‍हालाही पाहुणचाराला अनेकांच्या तालुक्यात जावे लागेल." त्यानंतर थोरांत यांनीही विखेंवर पलटवार केला आहे. थोरात-कोल्हे गटाच्या परिवर्तन पॅनलच्या प्रचार शुभारंभ सभेत थोरातांनी विखेंचा समाचर घेतला. हा कार्यक्रम वाकडी येथील खंडोबा मंदिरात शुक्रवारी (ता. ९) पार पडला.

Radhakrushna Vikhe Patil, Balasaheb Thorat
Eknath Shinde On Death Threat पवारांना आलेल्या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांचे ट्विट; म्हणाले, ‘त्यांच्याबद्दल आम्हा सर्वांनाच आदर....

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, "मी याच तालुक्यातील मतदार आहे. तुम्ही जिल्हाभर हुंदडता अन् मला पाहुणे कलाकार म्हणता. तसे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. सभासदांच्या आग्रहाखातर आम्ही येथे आलो. गणेश कारखान्याची आठ वर्षात यांनी काय अवस्था करून ठेवली आहे, हे सर्वज्ञात आहे. कोणत्याही गोष्टींचा हिशेब नाही. हा कारखाना 'संगमनेर' आणि 'संजीवनी' सारखाच चालवणार. आम्ही या परिसरामध्ये पुन्हा एकदा गणेशचे धुराडे पूर्ण क्षमतेने पेटावे, सभासदांचा सन्मान राखावा यासाठी एकत्र आलो आहोत."

Radhakrushna Vikhe Patil, Balasaheb Thorat
BJP News : सुमीत वानखडे बघणार वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंत्रणा !

सभासदांच्या आग्रहामुळे आम्ही निवडणुकीत आल्याचे विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी सांगितले. कोल्हे म्हणाले, "सभासदांनी माझी गाडी अडवली. त्यांनी गणेशच्या निवडणुकीत लक्ष घालण्याचा आग्रह धरला. आमच्या परिवाराच्या मागे बरेच व्याप आहेत, अनेक संस्थांवर जबाबदारीने काम करावे लागते. मात्र सभासदांचा आग्रह मी डावलू शकलो नाही. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय झाला. राजकारणापेक्षाही शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत आम्ही ही आघाडी केली. सभासद आणि शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी कोणत्याही प्रकारची राजकीय किंमत मोजायची माझी तयारी आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com