Eknath Shinde On Death Threat पवारांना आलेल्या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांचे ट्विट; म्हणाले, ‘त्यांच्याबद्दल आम्हा सर्वांनाच आदर....

शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल.
Eknath Shinde-Sharad Pawar
Eknath Shinde-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवारांना आलेल्या धमकीनंतर ट्विट करून सांगितले. (Chief Minister's tweet after the threat received by Sharad Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ट्विटरवरून ‘तुमचा दाभोलकर करेन’ अशी धमकी आली आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या धमकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विट करत सुरक्षेबाबत सूचना केल्याचे स्पष्ट केले आहे.

Eknath Shinde-Sharad Pawar
Chitra Wagh Vs Jitendra Awhad : चित्रा वाघ-जितेंद्र आव्हाड ट्विटरवर भिडले; ‘एंटी चेंबर’ ते ‘कुलू मनाली’ सगळंच चव्हाट्यावर आलं

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करुन धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल.

Eknath Shinde-Sharad Pawar
Katraj Dairy : पुणे जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आठ संचालकांची अजितदादांकडे फिल्डिंग; 'त्या' संचालकांमुळे पवारांचीही कसोटी

दरम्यान, पवारांना आलेल्या धमकीची राष्ट्रवादी काँग्रेसकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. त्यानंतर सरकारने तातडीने पाउले उचलत पवारांच्या निवासस्थानी असलेल्या सुरक्षेत वाढ केली आहे.

Eknath Shinde-Sharad Pawar
Bawankule On Death Threat: धमकी देणं आमच्या रक्तात नाही, पवारांना धमकी देणाऱ्यांना जेलमध्ये टाका; भाजप प्रदेशाध्यक्षांची भूमिका

जीवे मारण्याच्या धमकीवर खुद्द पवार यांचीही प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, धमकीची चिंता मी करत नाही. धमक्या देऊन कुणी आवाज बंद करू शकत नाही. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सरकारची आहे. राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्यांनी त्या संबंधीची काळजी घ्यावी. ज्याच्या हातात सूत्र आहेत, त्यांना ती जबाबदारी टाळता येणार नाही. धमक्या देऊन कुणी आवाज बंद करू शकत नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com