Ahmednagar Political News : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र खासदार सुजय यांनी एकाच वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरातांवर सडकून टीका केली. यावर थोरातांनीही एका वाक्यातच प्रत्युत्तर देत विषय संपवून टाकला. ते आणि त्यांचा पक्ष सर्वच पातळीवर उघडा पडत चालला आहे. त्यामुळे त्यांना सीरियस घेऊ नका, असा टोला थोरातांनी विखे पिता-पुत्राला लगावत जास्त बोलणे टाळले.
राज्याचे महसूल तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी राहाता येथून थोरातांना लक्ष्य केले. आमदार थोरात यांचे नाव न घेता काही नेते रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात, असा घणाघात त्यांनी केला होता, तर खासदार सुजय विखेंनी आमदार थोरात हे दोन महिन्यांपासून त्यांच्या कार्यक्रमांच्या फलकांवर सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधींचे छायाचित्र वापरत नाहीत. त्यामुळे ते आता भाजपकडे येत असल्याचे माझ्या कानावर आले आहे, असा दावा सुजय विखेंनी केला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विखे पिता-पुत्रांच्या या खळबळजनक विधानांनंतर आमदार थोरात (Balasaheb Thorat) अॅ क्टिव्ह झाले. ते म्हणाले, "त्यांना सीरियस घेऊ नका. ते आणि त्यांचा पक्ष उघडा पडत चालला आहे. काँग्रेसच्या चिंतन शिबिराचा आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी भक्कमपणे उभी राहत आहे. यातूनच भाजपने धसका घेतला आहे. कांदा निर्यातबंदी उठवली नव्हती, तोपर्यंत हे शांत होते, असा टोलाही विखेंना मारला.
"आता दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्याचे लोन इतर राज्यांमध्ये पसरू नये म्हणून कांदा निर्यातबंदी घाईघाईने उठवली. या निर्यातबंदीचे श्रेय घेण्यासाठी विखे पिता-पुत्र धडपडत आहेत. यामुळे ते मूळ मुद्द्यांवरून लक्ष भरकटवत आहेत. आमची नाळ काँग्रेसच्या विचारधारेशी आहे. ती कितीही संकटे आली तरी आणि अशा अफवांमुळे तुटणार नाही," असाही दावा थोरातांनी केला.
थोरातांची टोलेबाजी विखेंच्या जिव्हारी
काँग्रेसचे चिंतन शिबिर लोणावळा येथे पार पडले. शिबिरात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचे भाषण सर्वाधिक गाजले. त्यांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan), राधाकृष्ण विखे यांचा पक्षांतराचा इतिहासाच काढला. 'सत्तेसाठी उड्या मारणाऱ्यांना आपण बघत आलो आहोत. हे उड्या मारणारे पुन्हा काँग्रेसमध्ये येतील, पण त्यासाठी सत्ता हवी', अशी टोलेबाजी आमदार थोरातांनी केली होती. थोरातांनी विखे आणि चव्हाण यांच्यासह काँग्रेस सोडून जाणाऱ्यांचा चांगलाच पानउतारा केला होता. थोरातांची ही बोचरी टोलेबाजी विखे आणि चव्हाण यांच्यासह त्यांच्या समर्थकांना दुखणारी ठरली आहे. यातूनच आपल्याविषयी अशा प्रकारची विधाने केली जात असल्याचेही थोरातांनी सांगितले.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.