Pune Political News : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पुण्यामध्ये सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे यांनी स्वतः अमित यांच्यावर पुणे लोकसभेच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर अमित ठाकरेंचे पुणे दौरे सातत्याने होत आहेत. लोकसभेच्या दृष्टीने पक्षबांधणी सुरू असतानाच आता अमित ठाकरे (Amit Thackeray) हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पुण्याच्या मैदानात उतरणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU Pune) विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मनसेने एल्गार पुकारला आहे. त्यासाठी अमित ठाकरेंच्या नेतृत्वात 23 फेब्रुवारीला मनसेचा भव्य मोर्चा विद्यापीठावर निघणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर हा मोर्चा असणार आहे. त्यात उशिरा लागणारे निकाल, ललित कला केंद्र प्रकरण, विद्यार्थ्यांचे वसतिगृह यांसारख्या प्रश्नांवर मनसेने (MNS) आक्रमक पवित्रा घेतला आहे.
या मोर्चासंदर्भातच मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी पुण्यामध्ये एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत या मोर्चाची तारीख आणि आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे पुण्यात ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्याचे बोलले जात आहे. आता मनसेने पक्ष पातळीनंतर रस्त्यावरची लढाईदेखील सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण आणखीच तापणार यात शंका नाही.
गेल्या काही दिवसांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हा चर्चेचा विषय बनला आहे. विद्यापीठातील ललित कला केंद्र या ठिकाणी घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. यानंतर आता थेट विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात नसे आक्रमक झालेली आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न घेत मनसेने रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे चर्चेच केंद्र बनले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.