बाळासाहेब थोरात म्हणाले, विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार सोनिया गांधी ठरवतील...

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक संदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
Balasaheb Thorat

Balasaheb Thorat

Sarkarnama

संगमनेर ( अहमदनगर ) : महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी ( ता. 28 ) आहे. या दृष्टीने काँग्रेसने ( Congress ) तयारी सुरू केली आहे. या संदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. Balasaheb Thorat said, Sonia Gandhi will decide the candidate for the post of Legislative Council President ...

संगमनेर नगरपरिषदेच्या 200 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या उद्‌घाटन व लोकार्पण सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बाळासाहेब थोरात म्हणाले, लोकसभेप्रमाणे अध्यक्षनिवडीची पद्धत आम्ही स्वीकारली आहे. यात गुप्त पद्धतीने मतदान होत नाही. विधान सभेतही तशीच प्रक्रिया असते. सोमवारी ही निवडणूक जाहीर करून मंगळवारी प्रक्रिया पूर्ण होईल. अध्यक्षपदाचा उमेदवार सोनिया गांधी ठरवतील. तो आम्हा सर्वांना मान्य असेल, असे त्यांनी सांगितले.

Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरात म्हणाले, शेतकऱ्यांसमोर अहंकारी केंद्र सरकार झुकले...

राज्यात गाजलेल्या पेपरफुटी प्रकरणात काँग्रेसचा कोणीही दोषी आढळणार नाही किंवा कोणी मंत्री अडकण्याचा विषय नसल्याची ठाम ग्वाही थोरात यांनी दिली. या प्रकरणातील दोषींना शिक्षा झालेली दिसेल. या प्रकरणाच्या तपासासाठी आमची यंत्रणा सक्षम असल्याने, दुसऱ्याला निमंत्रण देण्याची आवश्यकता नाही. या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीच्या विरोधकांच्या मागणीवर थोरात यांनी हे स्पष्ट केले.

केंद्राने डिझेलचे दर कमी केले. राज्य मात्र करीत नसल्याने, त्यावेळी सायकलवरून मोर्चे काढणारे आता गप्प का बसले आहेत, याची विचारणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरात म्हणाले, ते खोल नैराश्यात गेले आहेत...

याबाबत विचारले असता थोरात म्हणाले, की केंद्र सरकारने कच्च्या तेलाचे दर अत्यंत कमी असतानाही डिझेलचे दर वाढवून सर्वसामान्यांच्या खिशातून खूप पैसा काढून घेतला. उलट, राज्याचे 31 हजार कोटी रुपये जीएसटी परतावा केंद्राकडून येणे बाकी आहे. आर्थिक अडचणींमुळे कर्मचारी पगार, विकासकामांसाठी राज्याला कर्ज काढावे लागत आहे. केंद्राकडून पैसे मिळण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले तर जास्त चांगले होईल, असा टोला फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.

मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर टीका कशाला? कोरोनाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र सांभाळला, त्याचे कौतुक देशाने केले आहे. आता ते आजारी असल्याने त्यांच्यावर टीका करू नये, असे संकेत सर्वांनी पाळले पाहिजेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार काम करावे लागते. खासदार राहुल गांधी यांचा 28 तारखेचा मुंबईतील ‌कार्यक्रम रद्द केला. काँग्रेस पक्षाकडूनदेखील नियम पाळण्याच्या‌ सूचना आहेत. शिवसेनेने दसरा मेळावा षण्मुखानंद हॉल येथे घेतला, तर 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनावरही बंदी घातली होती. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी काही निर्बंध घातले जात असतील तर ते नियम सर्वांसाठीच असल्याचे थोरात यांनी सांगितले.

Balasaheb Thorat

पटोले आणि थोरात यांची विनंती मान्य.. रजनी पाटील बिनविरोध राज्यसभेवर

आज घेणार राज्यपालांची भेट

थोरात म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाची माहिती राज्यपालांना देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते त्यांच्याची भेट घेण्यासाठी सायंकाळी 5.30 वाजता राजभवनावर जाणार आहेत. माझ्या बरोबर मंत्री छगन भुजबळ, एकनाथ शिंदे असणार आहेत. विधानसभेच्या अध्यक्षाबाबत राज्यपालांनीच आग्रह धरला होता. काँग्रेसकडून विधानसभेच्या अध्यक्षाची घोषणा उद्या सोनिया गांधी करतील, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार

राज्यपाल व सरकारमधील संघर्षावर पडदा नाहीच. विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्या, राज्यपालांकडून महाविकास आघाडीच्या कामात हस्तक्षेप होत आहे. हिंगोली, नांदेड, परभणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेल्या बैठका, ओबीसी अध्यादेशाच्या वेळी राज्यपालांकडून विचारणा होते. कृषी विद्यापीठांचे कुलगुरू नेमताना, अधिकारांची कपात अशा अनेक विषयांवर राज्यपाल विरूद्ध सरकार असा वाद दिसून येत असल्याचे, थोरात यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com