महेश माळवे
श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेसचे दोन गट तयार झाले आहेत. या दोन गटांतील वादावर काय उपाय करता येईल याची चाचपणी सुरू आहे. अशातच श्रीरामपूर नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचाही कार्यक्रम केव्हाही सुरू होऊ शकतो. ( Balasaheb Thorat will find a solution to stop factions in Congress )
श्रीरामपुरात काँग्रेसचे स्व. जयंत ससाणे व आमदार लहू कानडे यांचे दोन गट पडले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काल (ता. 13) दोन्ही गटाशी चर्चा केली. समेटाचा प्रयत्न सुरू केला असला तरी, काँग्रेसच्या विरोधात काम करणार्यांना तिकीट नको, अशी भूमिका ससाणे गटाने घेतली आहे. त्यामुळे माजीमंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) काय भूमिका घेतात हे पहावे लागेल.(Balasaheb Thorat News in Marathi)
आमदार डॉ. तांबे यांनी ससाणे गटाची माजी नगराध्यक्ष संजय फंड यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. यावेळी शहराध्यक्ष संजय छल्लारे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, साई संस्थानचे विश्वास्त सचिन गुजर, दिलीप नागरे, श्रीनिवास बिहाणी, नितीन पिपाडा, मुजफ्फर शेख, कैलास दुबय्या, दत्तात्रय सानप, आशिष धनवटे, लक्ष्मण कुमावत, राजेंद्र आदिक, अण्णासाहेब डावखर, मुन्ना पठाण आदी उपस्थित होते. यावेळी तांबे यांनी ससाणे गटाची भूमिका समजून घेतली.
यावेळी ज्यांनी विधानसभा निवडणुकीत कानडे यांच्या विरोधात काम केले. भगवे उपरणे परिधान करून उद्धव ठाकरे यांच्या सभेला हजेरी लावली. गेल्या निवडणुकीत ससाणेंचा वापर करून निवडून आले. नंतर आदिक गटाशी सलगी केली. पद वाचविण्यासाठी विखेंचा हात धरला. नंतर मुरकुटेंकडे गेले. आता काँग्रेसकडे तिकीट मागतात. यांच्यात हिंमत असेल तर काँग्रेसच्या तिकीटाशिवाय निवडणूक लढवावी, असे आव्हान ससाणे गटाने अंजुम शेख गटाचे नाव न घेता केले. तसेच आमचे ऐकायचे नसेल तर आम्हाला तिकीट देऊ नका, आम्ही आमच्या हिमतीवर लढू, असे तांबे यांना स्पष्ट सांगितल्याचे समजते.(Congress party Latest Marathi News)
थोरात यांच्या समवेत झालेल्या बैठकीत ससाणे गटाने सर्व संस्था पहायच्या आमदार त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट सांगितल्याची आठवणही यावेळी ससाणे गटाने करून दिल्याचे समजते.
यानंतर तांबे यांनी कानडे यांच्या यशोधन कार्यालयात अशोक कानडे यांची भेट घेतली. यावेळी अॅड. समीन बागवान, ज्ञानेश्वर मुरकुटे, अभिजित लिप्टे, आबा पवार, सुरेश पवार आदी उपस्थित होते. यावेळी त्यांची कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. फक्त आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व पालिका निवडणुकीची सुरू असलेली तयारी चालू ठेवण्याची सूचना केल्याचे समजते. एकंदरीत ससाणे व कानडे गटात झालेला विसंवाद माजी मंत्री थोरात यांच्याच कोर्टात मार्गी लागेल अशी चिन्हे आहेत.
थोरात म्हणतील तो शहराध्यक्ष
थोरात यांनी शहराध्यक्ष ससाणे गटाकडे, तर तालुका कानडे यांच्याकडे राहील असे सुरुवातीलाच झालेल्या बैठकीत सांगितले होते. त्यामुळे आता शहराध्यक्ष बदलायचा असेल तर याबाबतही थोरात सांगतील तो निर्णय मान्य राहील, असे ससाणे गटाकडून सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.