बाळासाहेब थोरातांचे भाचे झाले राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव

संग्राम कोते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून ते मुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक मानले जातात.
Sangram Kote Patil
Sangram Kote PatilSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. त्यांचे भाचे संग्राम कोते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून ते मुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक मानले जातात. कोते यांनी या पूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद भुषविले होते. त्यांच्याकडे आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेश सचिव पदाची धुरा सोपविली आहे. ( Balasaheb Thorat's nephew became NCP's state secretary )

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात विरोधी पक्षांमध्ये काम करत असताना कोते यांनी प्रभावीपणे राष्ट्रवादी विद्यार्थी व युवक काँग्रेसची बांधणी केली. त्याची दखल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनेक भाषणांमध्ये घेतली होती. कोते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील असून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे आहेत.

Sangram Kote Patil
साईसंस्थानच्या अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीचे संग्राम कोते नाराज आहेत का?

वन बूथ टेन युथ ही संकल्पना कोते यांनी राज्यभर राबविली. सोशल मीडियावर ते नेहमीच सक्रिय असतात. राज्यभर त्यांचा राजकीय संपर्क पाहता त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याची सांगितले जात आहे. केंद्र व राज्य सरकारच्या यांच्याविरुद्ध शंभराहून अधिक मोर्चे प्रदेश युवक अध्यक्ष असताना काढले होते. गाव व महाविद्यालय तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाखा या उपक्रमाअंतर्गत तीन हजारांहून अधिक शाखा विद्यार्थी काँग्रेसच्या अन्य राज्यात अनावरण केल्या होत्या.

Sangram Kote Patil
संग्राम कामाला लाग ! अजितदादांचा कोते पाटील यांना आदेश

हे सगळं सुरू असताना कोते यांनी तब्येच्या कारणास्तव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तो पक्षासाठी धक्कादायक होता कारण कोते यांनी खूप मजबूत पकड युवक विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून तयार करून महाराष्ट्रात व्यापक स्वरूपात काम उभे केले होते. काम उभं करत असताना राज्याचे सात दौरे करून साडेतीन लाखांहून अधिक किलोमीटर प्रवास त्यांनी केला होता.

Sangram Kote Patil
बाळासाहेब थोरात म्हणाले, देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणू...

आता राष्ट्रवादीने मुख्य प्रदेश कार्यकारिणीत सचिवपदी नियुक्ती केल्याने कोते समर्थकांत उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या मेहनतीला पक्षाने साद दिल्याची भावना समर्थकांत आहे. नवनवीन उपक्रम राबवून अनोख्या पद्धतीने पक्ष संघटना बळकट करण्याचं कसब कोते यांच्याकडे असून या संधीचा पक्षाला फायदा करून देतील त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com