खेड ( जि. पुणे ) - नेहमीच नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असणाऱ्या वारकरी संप्रदायातील कीर्तनकार बंडातात्या कराडकरांनी आज पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी यांच्या अहिंसावादी विचारांवर बंडातात्या कराडकरांनी त्यांचे मत व्यक्त केले. ( Bandatatya Karadkar said, Mahatma Gandhiji's non-violence and Hindutva are both partisan ... )
बंडातात्या कराडकरांनी हुतात्मा राजगुरुंच्या जन्मभुमीतून महात्मा गांधीच्या विचारांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार हे मात्र नक्की. हुतात्मा राजगुरुंच्या स्मूर्तीस्थळावर प्रवचन रुपी सेवा आज त्यांनी दिली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. या प्रसंगी बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्ती संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (Bandatatya Karadkar's Controversial Statement on Mahatma Gandhi)
बंडातात्या कराडकर म्हणाले, महात्मा गांधीजीचा अहिंसावाद आणि महात्मा गांधीजीचा हिंदूत्व ही दोन्ही तशी पक्षपाती आहेत. 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. ते अहिंसेच्या मार्गाने मिळालं नाही तर 1942 क्रांतिकारक चळवळ उभी राहिली. त्या चळवळीचा बोध इंग्रजांनी घेतला.
ते पुढे म्हणाले की, कुठ तरी सांगितले जाते की देशाच्या स्वातंत्र्यासाठी साबरमती के संत तुने कर दिया कमाला मिली हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल.. असं म्हणणं म्हणजे झाशीच्या राणीसह 350 क्रांतिकारकांचा अपमान असल्याचे कराडकरांनी म्हटलं आहे.
क्रांतिकारक भगतसिंगाच्या मनात महात्मा गांधींची छाप होती मात्र महात्मा गांधीजीचा अहिंसावाद भगतसिंगाच्या मनात ठसावला होता. आपल्या देशाला स्वातंत्र अहिंसक मार्गाने मिळवायचे हा भगतसिंगाच्या भ्रमाचा भोपळा तीन वर्षांतच फुटला. जालियनवाला बाग हत्याकांडाला गांधींनी समर्थन द्यायला नकार दिल्यानंतर भगतसिंग आणि गांधीजी यांच्यात नाराजी उभी राहिली.
महात्मा गांधीजींना म्हाताऱ्याची उपमा देत त्यांच्या मार्गाने जाण्याचे कारण नाही. त्यानंतर भगतसिंग क्रांतिकारक बनले. या दरम्यान लोकमान्य टिळकांची आठवण करुन देत या म्हाताऱ्याच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवायचा विचार केला तर 1 हजार वर्षे लागतील असे वादग्रस्त वक्तव्य केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.