Bandatatya Karadkar News : वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार हभप प्रकाश सदाशिव जंत्रे उर्फ बंडातात्या कराडकर यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला आहे. कराडकर यांना गुरुवारी (दि. १२) रोजी सकाळी ७ वाजता त्यांना फलटण येथील निकोप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, आता त्यांना अधिक उपचारांसाठी त्यांना पुणे येथे हलविण्यात आले आहे.
बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांना बुधवारी(दि.११) वडूज आणि पुणे येथे कीर्तन करताना थोडा त्रास जाणवला. परंतू, किरकोळ औषधे घेऊन त्यांनी पुण्यातच मुक्काम केला आणि सकाळी पिंप्रद येथे पोहोचल्यावर त्यांची प्रकृती ठीक वाटत नसल्यानं त्यांचा विरोध असतानाही तेथील अनुयायांनी त्यांना फलटण येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
निकोप हॉस्पिटलमध्ये प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. जे. टी. पोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरु केले. विविध वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर उपचाराची दिशा निश्चित झाल्यानं काल दिवसभर योग्य पद्धतीने उपचार केल्यानंतर हभप बंडातात्यांची प्रकृती सुधारली. रात्री त्यांना झोपही चांगली लागली, मात्र सकाळी पुन्हा पक्षाघाताचा दुसरा झटका आल्यानं त्यांना अधिक तपासण्या व अधिक उपचारांसाठी पुणे येथे पाठविण्यात आलं आहे.
बंडातात्या कराडकर हे कायम त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिध्द आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेत त्याला जोरदार विरोधही दर्शविला होता. यात कोरोनाकाळात आषाढीच्या पायी दिंडीला नाकारलेली परवानगी, बंद मंदिरं, किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीचा निर्णय,यांसारख्या विविध मुद्द्यांवरुन आघाडी सरकारवर सडकून टीका केली होती. तसेच विविध मागण्यांसाठी आंदोलनं देखील छेडली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.