Baramati News: अडीच लाखांच्या लाचप्रकरणी बारामतीचा अभियंता अडचणीत

Crime News: मित्र शिक्षकाने स्वीकारली लाचेची रक्कम
Anti-Corruption Bureau
Anti-Corruption BureauSarkarnama
Published on
Updated on

Baramati Bribe News: बारामती (Baramati) येथील लघु पाटबंधारे विभागात कार्यरत अभियंत्याच्या अडीच लाखांच्या लाचप्रकरणामुळे अडचणी वाढल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्याच्या वतीने मित्र असलेल्या एका शिक्षकाने ही लाचेची रक्कम स्वीकारली. त्यावेळीच त्यास लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी अधिक माहितीनुसार, तक्रारदाराच्या भूसंपादन केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळण्याचा प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडे पाठवायचा होता. तो प्रस्ताव पाठविण्यासाठी बारामती लघु पाटबंधारे विभागातील अभियंता संदीप गोंजारी (Sandip Gonjari) यांनी काही रक्कम मागितली होती.

तडजोडीअंती ती रक्कम अडीच लाख रुपये ठरली होती. ती रक्कम बारामती (Baramati) येथील जळोची रस्त्यावरील एका ठिकणी देण्याचे ठरले होते. ती रक्कम अभियंता गोंजारीच्या वतीने शिक्षक असलेला मित्र रणजीत प्रकाश सूर्यवंशी स्विकारली.

Anti-Corruption Bureau
Pune PSI Suspended : आरोपीकडूनच 50 हजार उकळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई !

दरम्यान, तक्रारदाने याबाबत लाचलुचपत विभागाकडे (Anti-Corruption Bureau) माहिती दिली होती. त्याची खात्री करून लाचलुचपत विभागाने संबंधित ठिकाणच्या परिसरात सापळा रचला होता. या पथकाने रणजीत सूर्यवंशी यास लाचेची रक्कम स्वीकारताना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे आता अभियंता संदीप गोंजारीच्या अडचणी वाढल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com