Manoj Jarange : "माझं डोकं फिरवू नका, खुमखुमी असेल, तर...", फडणवीसांच्या विश्वासू आमदाराचं छाती बडवत जरांगेंना 'चॅलेंज'

Rajendra Raut On Manoj Jarange Patil : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे-पाटील हे आमने-सामने आले आहेत. आता आमदार राऊत यांनी जरांगे-पाटलांवर थेट निशाणा साधला आहे.
devendra fadnavis | manoj jarange patil
devendra fadnavis | manoj jarange patil sarkarnama
Published on
Updated on

मनोज जरांगे-पाटील तुम्ही नेमक्या कोणाला शिव्या देता आहात? काय चाललं आहे? मराठा समाजानं तुमचा आदर केला आहे. मात्र, कशाला वाटेला जायचं म्हणून मराठ्यांचे आमदार, आजी-माजी मंत्री गप्प बसून तुमच्या शिव्या खात आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केली आहे.

मनोज जरांगे-पाटील यांनी आमदार राजेंद्र राऊत ( Rajendra Raut ) यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना शुक्रवारी आमदार राऊत यांनी जरांगे-पाटील यांच्यावर थेट हल्ला केला. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

ही तुमची भाषा आहे का...

राजेंद्र राऊत म्हणाले, "मला तर जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) म्हणतात सं****** बसला आणि मु****** गेला. ही तुमची भाषा आहे का? माझ्या आतड्याला संसर्ग झाल्या मी जरांगे-पाटलांना चार ते पाच दिवस उशिरा भेटायला गेलो. तेव्हा, जरांगे-पाटलांची भाषा योग्य होती का? हा सुसंस्कृतपणा झाला का? हेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवलं आहे का?"

devendra fadnavis | manoj jarange patil
Manoj Jarange Patil : भुजबळांचं चॅलेंज अन् जरांगे-पाटलांनी चार शब्दांत विषयच संपवला...

एवढी खुमखूमी जर, असेल तर सभा घ्या...

"आरक्षणाची गरज किती आहे, हे माझी बायको आणि आई-वडील यांना सुद्धा माहिती आहे. मात्र, माझी बायको आणि आई-वडील तुम्हाला काही बोलले का? बार्शी तालुक्यातील मराठ्यांची पोर जर तुम्हाला प्रश्न विचारल्यानं तुमच्या नाकाला झोंबलं. पण, तुम्ही माझ्या कुटुंबापर्यंत जात आहे. माजलगावमधील सभेत जरांगे-पाटील म्हणतात, राजा राऊतच्या दारात सभा घेण्यासाठी जागा आहे का? राजा राऊतच्या दारात सभा घेण्याची आपणाला एवढी खुमखूमी जर, असेल तर घ्या," असं आव्हान आमदार राऊत यांनी जरांगे-पाटलांना दिलं आहे.

...तर राजा राऊत म्हणतात मला

"मराठ्यांच्या छाव्याला आणि छत्रपतींच्या मावळ्याला डिचवण्याचा प्रयत्न केला आहे. खंडोजी खोपडेच्या भूमिकेत जाल, तर राजा राऊत म्हणतात मला. होणाऱ्या परिणामांची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल. माझं डोकं फिरवू नका तुम्ही..," असं म्हणत आमदार राऊत जरांगे-पाटलांवर भडकले.

devendra fadnavis | manoj jarange patil
Manoj Jarange Patil : आमदार राऊतांच्या 'त्या' गंभीर आरोपाला मनोज जरांगेंचं उत्तर, म्हणाले, 'बार्शीत येऊन...'

'इमानदारीनं या...

"कोण मराठ्यांचा माणूस बोलत नव्हता. मात्र, हा पठ्ठ्या राजा राऊत ( छाती बडवत ) शानमध्ये बोलत होता. किती तुकडे होणार आणि किती तुकडे करायला लावायचे आहेत, याचं भान मला पण राहणार नाही. सभा उधळणे माझे काम नाही. इमानदारीनं या... तुमची सभा घेण्याची जबाबदारी राजा राऊतची असेल," असं चॅलेज आमदार राऊत यांनी जरांगे-पाटलांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com