बार्शीत राष्ट्रवादी टाकणार मोठा डाव! बारबोले अन् जयंत पाटलांची झाली भेट

बार्शी (Barshi) नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहरात जोरदार हालचाली सुरू आहेत.
Jayant Patil
Jayant Patil

बार्शी : बार्शी (Barshi) नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर जोरदार हालचाली सुरू आहेत. माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले (Vishwas Barbole) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाटेवर असल्याचे समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची त्यांनी नुकतीच भेट घेतल्याने त्यांचा लवकरच पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या वैराग नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर यांनी सत्ता मिळवली. यामुळे बार्शीसह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल आहे. बारबोले यांनी नुकतीच एका विवाह सभारंभात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते लवकरच राष्ट्रवादीच्या गोटात दाखल होऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.

Jayant Patil
आमदारकीचा योग? चंद्रकांतदादा बनले ज्योतिषी अन् पाहिला प्रदीप कंद यांचा हात!

आमदार राजेंद्र राऊत यांच्या गोटात सध्या बारबोले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास राऊत यांची राजकीय ताकद कमी होणार आहे. बार्शी शहरात बारबोले गट आपली ताकद राखून आहे. आमदार राऊत यांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी माजी मंत्री दिलीप सोपल, राजेंद्र मिरगणे, भाऊसाहेब आंधळकर एकत्र येऊन लढा देणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे बारबोले हे राष्ट्रवादीत प्रवेश करून स्वतंत्रपणे लढणार की या तिघांना साथ देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Jayant Patil
आर्यन खानला जामीन मिळवून देणारे रोहतगी उतरले नितेश राणेंसाठी मैदानात

बार्शी नगरपरिषदेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्यातच माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांनी जयंत पाटील यांची भेट घेतल्याने या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे त्यांना लवकरच पक्षात प्रवेश होऊ शकते, असेही बोलले जात आहे. नगरपरिषदेच्या 1996 च्या निवडणुकीत बारबोले यांनी सोपल यांच्याशी सवतासुभा करुन स्वतंत्रपणे लढून यश संपादन केले होते. त्यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आमदार राऊत यांना विधानसभेसाठी शिवसेनेने संधी दिली होती. पण, त्यांचा निसटता पराभव झाला होता अन् राऊतांचे नेतृत्व उदयास आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com