Patan : सामाजिक विकृतींविरूद्धच्या लढाईस सज्ज रहा : चित्रा वाघ

सिताई फाऊंडेशनच्या Seetai Foundation वतीने आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नऊ महिलांना Nine Womans सिताई नवदुर्गा पुरस्काराने Seetai Navdurga Award सन्मानित करण्यात आले.
BJP Leader Chitra Wagh
BJP Leader Chitra Waghsarkarnama

ढेबेवाडी : 'महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात बचतगटांना मोठे महत्व आहे. राज्यात महिला बचतगटांची विविध उत्पादने वर्षातील बाराही महिने विकता येतील अशी योजना लवकरच आणून ती प्रभावीपणे राबविणार असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितले. आता शिक्षण व कायद्याच्या शस्त्राने सामाजिक विकृती विरोधातील लढाईसाठी सज्ज राहा, असे आवाहनही त्यांनी महिलांना केले.

तळमावले (ता.पाटण) येथे लोकनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून कविता कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिताई फाऊंडेशनच्या वतीने आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नऊ महिलांना सिताई नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य भरत पाटील, सरपंच शोभाताई भुलुगडे, डॉ.सारिका गावडे, फत्तेसिंह पाटणकर, अमित पाटील, महादेव साळुंखे, डॉ. उमेश गोंजारी, विद्याताई पावसकर उपस्थित होत्या.

BJP Leader Chitra Wagh
चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना राखी बांधावी, अन्यथा..,पोहरादेवीच्या महंतांचा इशारा

चित्रा वाघ म्हणाल्या, 'संघर्ष तुमच्या पाचवीलाच पुजला आहे. आईच्या पोटात असल्यापासून ते सरणावर पोहोचेपर्यंत महिलांच्या जीवनातील संघर्ष संपत नाही. विविध देवींची रूपे तुम्ही आहात पण, आता लढाई वेगळी आहे. समाजातील विकृती विरूद्ध तुम्हाला लढाई लढायची आहे. त्यासाठी शिक्षण व कायदा हिच शस्त्रे तुम्हाला वापरावी लागतील. तुमच्या न्याय, हक्क व संरक्षणासाठी खूप मोठे कायदे आहेत ते अभ्यासा व जाणून घ्या.

BJP Leader Chitra Wagh
औरंगाबाद लोकसभा भाजप लढवणार की शिंदे सेना ? केंद्रीय मंत्र्यांची गुगली..

आरक्षणाने तुम्हाला सक्षमता व ताकद मिळाली असली तरी आरक्षण बदलल्यावरही तुम्ही कार्यरत राहायला पाहिजे. सध्याचे युग जाहिरातीचे आहे. कोणत्याही उत्पादनात मार्केटिंग व पॅकेजिंगला खूप महत्व असते. त्याचे प्रशिक्षण देवून महिला बचतगटांची विविध उत्पादने वर्षातील बाराही महिने विकता येतील, अशी योजना आम्ही राज्यात लवकरच आणून प्रभावीपणे राबविणार आहोत.' भरत पाटील यांचे भाषण झाले. सीमा घारगे,राधिका पन्हाळे, रोहिणी पाटील, सरिता घारे, विद्या नारकर, रेखाताई देशपांडे, प्रिती गुरव,वनिता शिर्के,दिपाली खोत यांचा पुरस्कार प्राप्त महिलांमध्ये समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com