मुंबई : गेले अनेक दिवस शिंदे सरकाराचा बहुचर्चीत लांबणीवर पडलेला मंत्रीमंडळ विस्तार मंगळवारी (ता.९ ऑगस्ट) पार पडला आहे. त्यामध्ये भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ अशा एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनाही स्थान देण्यात आल्याने विरोधकांकडून भाजप आणि शिंदे गटाविरोधात जोरदार टीका करण्यात येत आहे.
यामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही राठोडांच्या विरोधात चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान,आता पोहरादेवीच्या महंतांनी देखील चित्रा वाघ यांनी यांनी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांना इशारा दिला आहे. (Chitra Wagh Latest News, Sanjay Rathod Latest News)
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राजीनामा द्यावा लागणारे राठोड यांना नवीन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेटमंत्रिपद मिळाले आहे. मात्र यावरून विरोधकांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. यामुळे चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये भाजप जरी सत्तेत सहभागी असला तरी चित्रा वाघ यांनी मात्र राठोडांच्या मंत्रिपदाला विरोध कायम ठेवला आहे. यामुळे पोहरादेवीच्या महंतांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला असून वाघ यांनी संजय राठोडांना राखी बांधावी, अन्यता महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराच दिला आहे.
महंतांनी याबाबत पत्रकार परिषद घेत वाघ यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, वाघ यांनी केवळ प्रसिद्धीच्या मोहात जाऊन काहीही बडबड करू नये. आपण बुद्धीवान असाल तर, राठोडांच्या हाताला राखी बांधा आणि तुम्ही त्या ठिकाणी पापक्षालन करा असा सल्ला त्यांनी चित्रा वाघ यांना दिला. तसेत ते म्हणाले की, जेव्हा संत-महंत धर्मपीठावरून आदेश देतील, तेव्हा महाराष्ट्रात फिरायला जागा मिळणार नाही. राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानंतरही आरोप होत असेल तर, येणाऱ्या 2024 मध्ये त्यांची जागा दाखवू,' असा इशाराही महंतांनी यावेळी दिला आहे. आता महंतांनी दिलेल्या इशाऱ्यावर चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देतात हे बघावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.