Solapur News : पालकमंत्री गोरेंच्या एन्ट्रीपूर्वी सोलापुरात घमासान; स्वागत फलकावरून पोलिस-भाजप कार्यकर्त्यांत बाचाबाची!

Jaykumar Gore Solapur Tour : सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पहिलाच दौरा पोलिस आणि कार्यकर्त्यांच्या बाचाबाचीमुळे गाजला आहे. गोरे यांच्या एन्ट्रीपूर्वीच सोलापूर शहरात स्वागतासाठी लावलेले बॅनर काढल्याने पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
Jaykumar Gore Solapur Tour
Jaykumar Gore Solapur TourSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 23 January : सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पहिलाच दौरा पोलिस आणि कार्यकर्त्यांच्या बाचाबाचीमुळे गाजला आहे. गोरे यांच्या एन्ट्रीपूर्वीच सोलापूर शहरात स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर काढल्याने पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. पोलिसांच्या कारवाईविरोधात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. मात्र, आक्रमक कार्यकर्त्यांनी काढलेले बॅनर पुन्हा त्याच ठिकाणी लावले. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या पहिल्याच दौऱ्यात जोरदार घमासन पहायला मिळाले.

जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी विकास कामांच्या नियोजनाच्या आढाव्याची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला गोरे हे आज सोलापूर शहरात आले होते. तत्पूर्वीच स्वागताच्या फलकावरून भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार घमासान पहायला मिळाले. स्वागत फलक काढण्यावरून भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सोलापुरातील (Solapur) सात रस्ता परिसरात ‘नो डिजिटल झोन’ असतानाही बॅनर लावले होते. मात्र, सात रस्ता चौक परिसर हा नो डिजिटल झोन आहे. याशिवाय शिवाय कोणतीही परवानगी न घेता हे बॅनर लावण्यात आले होते, त्यामुळे महापालिकेने कारवाई करतं हे बॅनर हटवले होते.

Jaykumar Gore Solapur Tour
VSI Meeting : अजितदादा अन्‌ साहेबांसह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रथमच एकत्र; जिरवीजिरवीची भाषा करणारे हास्यविनोदात मशगूल...

बॅनर हटविण्यासाठी सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांमध्ये आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आम्ही फ्लेक्स लावण्यासाठी परवानगी द्यावी म्हणून अर्ज केलेला होता. मात्र, पोलिसांनी कारवाई केल्याचं कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. ते आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, सोलापुरातील सात रस्ता परिसरातील ‘नो डिजिटल झोन’मध्ये लावण्यात आलेले स्वागताचे फलक पोलिसांनी तातडीने काढले. स्वागत फलक काढल्याने भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली होती. मात्र, बॅनर लावण्यासाठी भाजपचे कार्यकर्तेही आक्रमक होते. त्यामुळे सोलापूर महापालिकेकडून बॅनर काढल्यानंतर त्याच जागी कार्यकर्त्याने पुन्हा बॅनर लावले आहेत.

Jaykumar Gore Solapur Tour
Solapur Guardian Minister : पालकमंत्री गोरेंचे 60 फूट लांबीचा हार घालून सोलापुरात स्वागत; निंबाळकर, सातपुतेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन

पालकमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जयकुमार गोरे हे पहिल्यांदाच सोलापूर शहरात आज आले होते. त्यांच्या येण्यापूर्वी सोलापूर शहरात या घडामोडी घडल्याने त्याची विशेष चर्चा रंगली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी ‘नो डिजिटल झोन’मध्ये लावलेले बॅनर महापालिका हटवते का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com