VSI Meeting : अजितदादा अन्‌ साहेबांसह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रथमच एकत्र; जिरवीजिरवीची भाषा करणारे हास्यविनोदात मशगूल...

NCP Leader Came Together : विशेष म्हणजे हे सर्व नेते एकमेकांच्या शेजारी बसून हास्यविनोद रंगले होते, त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांवर टीकास्त्र सोडणारे हेच ते नेते आहेत, असा प्रश्न पाडावे, असे वातावरण व्यासपीठावर दिसून आले.
Vasantdada Sugar Institute Meeting
Vasantdada Sugar Institute MeetingSarkaranama
Published on
Updated on

Pune, 23 January : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दोन्ही पक्षातील नेतेमंडळी एकमेकांना पाण्यात पाहते होते. निवडणुकीच्या काळात तर एकमेकांची उणीदुणी काढण्याची एकही संधी या नेत्यांनी सोडली नव्हती. विशेषतः ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे यांनी एकमेकांवर टोकाची टीका केली होती. मात्र, मागील सर्व काही विसरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आज एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. विशेष म्हणजे हे सर्व नेते एकमेकांच्या शेजारी बसून हास्यविनोद रंगले होते, त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांवर टीकास्त्र सोडणारे हेच ते नेते आहेत, असा प्रश्न पाडावे, असे वातावरण व्यासपीठावर दिसून आले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय VSI) 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने हे सर्व दिग्गज नेतेमंडळी पुण्याजवळी मांजरी येथील संस्थेच्या कार्यालयात एकत्र आले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार हे ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष असून माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे उपाध्यक्ष आहेत. तसेच बडी दिग्गज मंडळी या संस्थेचे सदस्य आहेत. त्यामुळे या संस्थेच्या वार्षिक सभेत दोन्ही राष्ट्रवादीतील नेते प्रथमच एकत्र आले होते.

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार, व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, माजी मंत्री राजेश टोपे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार विश्वास पाटील, बबनराव शिंदे, पी. आर, पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, इंद्रजित मोहिते, अरविंद गोरे, अशोक पवार, विश्वजित कदम, नरेंद्र घुले आदी नेते एका सभेला उपस्थित होते.

Vasantdada Sugar Institute Meeting
Income Tax : नोकरदार तर सोडाच, अब्जाधीशालाही द्यावा लागत नाही एक रुपयाही टॅक्स! जगात आहेत असेही देश...

शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, बाबासाहेब पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीतील नेते एका ओळीत शेजारी शेजारी बसले होते. अजितदादा आणि जयंतराव पाटील हे एकमेकांच्या शेजारी बसून हास्यविनोद करत होते. दुसरीकडे आंबेगावमध्ये जाऊन वळसे पाटील यांना पाडा म्हणून सांगणारे शरद पवार हे वळसे पाटील यांना काही गोष्टी समजावून सांगत होते. त्यामुळे व्यासपीठावरील वातावरण एकदमचे हलकेफुलके होते.

शरद पवार यांचं भाषण सुरू असताना हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात हास्यविनोद रंगला होता. विशेषतः एरवी एकमेकांना पाण्यात पाहणारे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अजितदादा यांच्यातील हास्यविनोद विशेष लक्षवेधी ठरला. अजितदादा आणि जयंत पाटील हे दोघे एकमेकांच्या शेजारी बसले होते.

Vasantdada Sugar Institute Meeting
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : शिवसेना फुटीनंतर सहानुभूती मिळाली ठाकरेंना; पण मतांचं दान शिंदेंच्या पारड्यात..! काय आहे कारण ?

हर्षवर्धन पाटील आणि अजितदादा यांच्यातील बोलणे संपल्यानंतर जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि अजित पवार यांच्यात मैफिल रंगली. त्या तिघांमध्ये हास्यविनोद एवढा रंगली की अजितदादांनीच तोंडावर बोट ठेवत आता शांत असे खुणावले. त्यामुळे राष्ट्रवादीतील फुटीनंतर एकमेकांची जिरवाजिरवी करणारे हे नेते व्हीएसआयच्या व्यासपीठावर मात्र हास्यविनोद रंगले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com