Pandharpur News : पंढरपुरात भगीरथ भालके, कल्याणराव काळे, अभिजित पाटील आले एकत्र : निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीबरोबरच कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखालील चंद्रभागा कारखान्याची निवडणूकही जाहीर झाली आहे.
Bhagirath Bhalke, Kalyanrao Kale, Abhijeet Patil
Bhagirath Bhalke, Kalyanrao Kale, Abhijeet PatilSarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात (Pandharpur) वेगवान घडामोडी घडत आहेत. सकाळीच माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) आणि भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांची एक बैठक झाली. त्यानंतर सध्या पंढरपुरात भालके, काळे आणि अभिजित पाटील (Abhijeet Patil) अशी विठ्ठल परिवारातील नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. (Bhagirath Bhalke, Kalyanrao Kale, Abhijeet Patil came together in Pandharpur)

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी परिचारक यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्ठीनेच सकाळी त्यांनी कल्याणराव काळे आणि भगिरथ भालके यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्यात विरोधी गटाला चार जागा देण्याचा पर्याय परिचारक यांनी ठेवला असल्याचे समजते. मात्र, त्यावर कार्य निर्णय होऊ शकला हे समजू शकलेले नाही.

Bhagirath Bhalke, Kalyanrao Kale, Abhijeet Patil
Chandrakant Patil News : चंद्रकांत पाटील हे १६ तासांचा ‘शिरूर पॅटर्न’ राज्यभर राबविणार

परिचारकांसोबतची बैठक संपल्यानंतर विठ्ठल परिवारातील अभिजित पाटील, कल्याणराव काळे आणि भगीरथ भालके यांची एकत्रित बैठक होत आहे. ही बैठकही कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या संदर्भानेच सुरू आहे, त्यात परिचारक यांनी ठेवलेल्या पर्यायावर चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे, विठ्ठल परिवारातील हे नेते एकत्र येणार का, असा सवाल आहे.

Bhagirath Bhalke, Kalyanrao Kale, Abhijeet Patil
Atique Ahmed Murder Case : अतिक अहमदच्या खून प्रकरणी संशयाची सूई त्याच्या साडूवर

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीबरोबरच कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखालील चंद्रभागा कारखान्याची निवडणूकही जाहीर झाली आहे. ती बिनविरोध करण्याचा प्रयत्न काळे यांचा असणार आहे. त्यामुळे विठ्ठल परिवारातील नेत्यांकडे आता लक्ष लागले आहे. एरव्ही भालके-काळे आणि अभिजित पाटील एकत्रित येत नाहीत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भालके आणि पाटील हे इच्छूक आहेत, त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com