Atique Ahmed Murder Case : अतिक अहमदच्या खून प्रकरणी संशयाची सूई त्याच्या साडूवर

इम्रान हा आधी अतीकसोबत काम करत होता. पण, काही मतभेदानंतर तो अतिकपासून वेगळा झाला होता.
Atique Ahmed
Atique Ahmed Sarkarnama

लखनऊ : अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या खुनाची (murder) तपासाची सुई त्याचे जुने जवळचे मित्र आणि शत्रूंकडे वळली आहे, त्यापैकी इम्रान नावाची एक व्यक्ती आहे. इम्रान हा अतिकचा सख्खा साडू आहे. इम्रान हा आधी अतीकसोबत काम करत होता. पण, काही मतभेदानंतर तो अतिकपासून वेगळा झाला होता. अतिक आणि त्यांचा भाऊ अशरफ यांचा प्रयागराजमध्ये १५ एप्रिल रोजी रात्री तिघांनी गोळ्या झाडून खून केला होता. (Suspicion on a relative in Atique and Ashraf murder case)

उमेश पाल खून प्रकरणानंतर प्रयागराज पालिका प्रशासनाने अतिकचा मेहुणा इम्रानच्या बेकायदेशीर प्लॉटिंगवर बुलडोझर चालवला होता. बख्शीमोडा येथील इम्रानच्या बेकायदा भूखंडावरही कारवाई करण्यात आली होती. इम्रान अतिकच्या जवळचा होता; पण अतिकला तो आवडत नव्हता. इम्रान आणि मोहम्मद मुस्लिम यांची सतत भेटत होते, असे पोलिस तपासात पुढे आले आहे. अतिकच्या खुनापूर्वही दोघांची भेट झाली होती. बिल्डर असलेला मोहम्मद मुस्लिम हा अतिकचा सर्वात मोठा फायनान्सर होता.

Atique Ahmed
Atique Ahmed Murder Case : अतिक-अश्रफ खूनप्रकरणी पाच पोलिस निलंबित : ‘किती दिवस छोटे-मोठे शूटर्स राहायचे?’ हल्लेखोरांचा पोलिसांना उलटा सवाल

मोहम्मद मुस्लिम याला एसटीएफने ताब्यात घेतले आहे.अतिकचा मुलगा असद याच्याशी तो बोलत असल्याचा एक ऑडिओ समोर आला आहे, त्यानंतर एसटीएफने ही कारवाई केली आहे. मोहम्मद मुस्लिमने अतिकची पत्नी शाइस्ता हिला ८० लाख दिले होते.

Atique Ahmed
Ram Satpute News : राम सातपुतेंवर भाजपश्रेष्ठींनी सोपवली मोठी जबाबदारी : गोवा, गुजरातनंतर आता कर्नाटक मोहीम

दरम्यान, बुधवारी प्रयागराजमधील शहागंज पोलिस ठाण्याचे एसएचओ अश्वनी कुमार सिंह यांच्यासह पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये दोन पोलिस उपनिरीक्षक आणि दोन हवालदारांचा समावेश आहे. जबाबदारी पार पाडताना निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

Atique Ahmed
Atique Ahmed News : अतिकच्या खुनापूर्वी त्याच्या पत्नीने सीएम योगींना लिहिलेले पत्र आले पुढे : 'तुम्ही हस्तक्षेप न केल्यास माझी मुलं, पती, दीराचा...'

अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त रमित शर्मा यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) सतीश चंद्र यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. अन्य दोन सदस्यांमध्ये एसीपी कोतवाली सतेंद्र प्रसाद तिवारी आणि निरीक्षक (इन्व्हेस्टिगेशन सेल, गुन्हे) ओम प्रकाश यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com