Bharat Gogawle : भरत गोगावलेंचं अंबाबाईला साकडं, म्हणाले, 'या महिन्यात...'

Bharat Gogawle Ministership : सहकुटुंब कोल्हापूरला जाऊन घेतलं अंबाबाईचं दर्शन; जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले?
Bharat Gogawale News :
Bharat Gogawale News :Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : शिवसेना (शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा जगजाहीर आहे. वेळोवेळी हे त्यांच्या वक्तव्यांमधून आणि कृतीमधून दिसून आले आहे. गोगावले हे दीड वर्षापासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. पहिल्या मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने, दुसऱ्या मंत्रिमंडळविस्तारात त्यांची वर्णी लागेल, असं निश्चित मानलं जातं होतं.

मात्र राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवारांसह (Ajit Pawar) त्यांचे आमदार सरकारमध्ये सहभागी झाले. इतकेच नाही, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर त्यांच्या गटातील आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने, शिंदे-फडणवीस सरकाचा मंत्रिमंडळविस्तार झाला नाही आणि भरत गोगावलेंची संधी हुकली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bharat Gogawale News :
Shirur Loksabha: अजितदादांनंतर मुख्यमंत्री शिंदेंचंही 'मिशन शिरूर' कोल्हेंविरोधात उमेदवार कुणाचा; अजितदादा की शिंदेंचा ?

मात्र तरीही गोगावले (Bharat Gogawle) यांनी आपले प्रयत्न सोडलेले नाहीत. नववर्षानिमित्त त्यांनी कोल्हापूरमधील अंबाबाईचे सहकुटुंब दर्शन घेतले आणि देवीला मंत्रिपदासाठी साकडं घातल्याचं समोर आलं आहे.

दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गोगावले म्हणाले, 'मी दरवर्षी 1 जानेवारी रोजी कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानीदेवी आणि शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतो. मी माझ्या मतदारसंघात जी सेवा करतोय, तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे, आता मला चौथ्यांदा सेवा करायची आहे आणि चौकार मारायचा आहे.'

मंत्रिपदाबाबत बोलताना म्हणाले, ही तर सर्वांचीच इच्छा आहे. असं वाटतंय, या नवीन वर्षात या पहिल्या महिन्यात कदाचित मंत्रिपदाची इच्छाही पूर्ण होईल. एकच इच्छा आमची राहिलेली आहे, ती पूर्ण होईल असं वाटतं आहे. थोडे दोन-तीन देव वाढले आहेत, त्यामुळे आता पूर्ण ताकद लावून तीही इच्छा पूर्ण होईल, असं वाटतं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Bharat Gogawale News :
Lok Sabha Election 2024 : महायुतीत सर्वकाही आलबेल नाही? भाजप नेत्याच्या वक्तव्यावरून चर्चांना उधाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com