Sahyadri Express : सह्याद्री एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा थरार; रेल्वे थांबताच मोबाईल, दागिने आणि रोख रक्कम लंपास

sahyadri Express security : कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्सप्रेस भिलवडी स्थानकावर थांबल्यानंतर चोरट्यांनी प्रवाशांना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे.
sahyadri Express
sahyadri Expresssarkarnama
Published on
Updated on

Sangli News : शंकर भोसले

कोल्हापूर-पुणे आणि पुणे-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेसमध्ये शनिवारी मध्यरात्री भिलवडी रेल्वे स्थानकावर चोरट्यांनी धाडसी चोरी करत प्रवाशांना लक्ष्य केले. शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर गाडी थांबलेली असताना खिडकीतून हात घालून दोन प्रवाशांच्या पर्स चोरल्या. यामध्ये अंदाजे आठ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली.

तर दुसऱ्या घटनेत पुणे-कोल्हापूर या गाडीतून पहाटे सव्वातीन वाजता उतरलेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने, पाच हजार रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून चोरटे पसार झाले. या सलग घटनांमुळे सह्याद्री एक्सप्रेसच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्सप्रेस भिलवडी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर थांबल्यानंतर चोरट्यांनी गाडीच्या खिडकीतून हात घालून दोन प्रवाशांच्या पर्स चोरल्या. त्यामधील एका प्रवाशाचे तीन हजार, तर दुसऱ्या प्रवाशाचे पाच हजार रुपये लंपास करण्यात आले.

sahyadri Express
Nashik-Pune Railway: फडणवीस आता तरी नाशिक-पुणे रेल्वेचा तिढा सोडवणार? आंदोलन महिनाभरासाठी स्थगित; नागरिकांचा अल्टिमेटम

याचवेळी पुणे-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेसमधून उतरलेल्या एका महिला प्रवाशाला प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील अंधाराचा फायदा घेत दोन चोरट्यांनी गाठले. महिलेच्या गळ्यातील सुमारे चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने, पाच हजार रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून चोरटे क्षणार्धात पसार झाले. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली; मात्र तोपर्यंत चोरटे निसटले होते.

विशेष म्हणजे, रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त असतानाही एकाच रात्री येणाऱ्या आणि जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसमध्ये चोरीच्या दोन घटना घडल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी शेणोली स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड करून प्रवाशांचे साहित्य लुटल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा भिलवडी परिसरात चोरी झाल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

sahyadri Express
Pune Nashik Railway Project : महाराष्ट्राला ब्रेक? संगमनेरवर अन्याय? पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पावर एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराचा संताप

वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे सह्याद्री एक्सप्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दल (RPF) व जीआरपी (GRP) यांचा बंदोबस्त वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. एका बाजूला सह्याद्री एक्सप्रेसला रेल्वे प्रशासनाने वाढीव भाडे लागू केले असताना, दुसरीकडे पुरेशी सुरक्षा मिळत नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शिवाय, रेल्वे भाडेवाढ आणि चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com