सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या (Bhima Sugar Factory) निवडणुकीत भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी एकहाती विजय मिळवत हॅट्ट्रीक साधली आहे. महाडिक यांच्या पॅनेलचे सर्वच सर्व १५ जागा तब्बल साडेसहा हजारांच्या फरक्याने जिंकल्या आहेत. महाडिक यांनी सलग तिसऱ्यांदा कारखाना हाती राखताना ऐतिहासिक विजय मिळविला आहे. (Bhima Sugar : Big win for Dhananjay Mahadik group; 6500 margin on all seats)
मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भीमा परिवार, तर माजी आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भीमा बचाव पॅनेल आमने सामने आले होते. कारखान्यासाठी चुरशीने ७९ टक्के मतदान झाले होते. त्याची आज सोलापुरात मतमोजणी झाली.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच महाडिक यांच्या पॅनेलने आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत कायम ठेवत कारखाच्या इतिहास मोठा विजय नोंदविला आहे. कारखान्याचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक हे संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून विजयी झाले आहेत, तर त्यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक यांनी पुळूज गटातून बाजी मारली आहे. महाडिक पिता-पुत्र प्रथमच कारखान्याच्या संचालकमंडळात दिसणार आहेत.
धनंजय महाडिक गटाचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते
पुळूज गट
विश्वराज धनंजय महाडिक (१०६२९)
बिभिषण वाघ (१०२३७)
टाकळी सिकंदर गट
संभाजी कोकाटे (१०५८८)
सुनील चव्हाण (१०५६३)
सुस्ते गट
तात्यासाहेब नागटिळक (१०७६४)
संतोष सावंत (१०१३८)
अंकोली गट
सतीश जगताप (१०१९०)
गणपत पुदे (१००३१)
कोन्हेरी गट
राजेंद्र टेकळे (१०५७१)
सहकारी संस्था प्रतिनिधी मतदारसंघ
धनंजय महाडिक (३१)
अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी
बाळासाहेब गवळी (१०७४६)
महिला राखीव
सिंधू जाधव (१०७७८)
प्रतिक्षा शिंदे (१०२९२)
इतर मागासवर्ग प्रतिनिधी
अनिल गवळी (१०८६४)
भटक्या विमुक्त जाती-जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी
सिद्राम मदने (१०७७८)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.