Bidri Sugar Factory Election : कोल्हापूरच्या राजकारणात चमत्कार; ‘बिद्री’च्या छाननीवेळी कट्टर विरोधक बसले मांडीला मांडी लावून

Kolhapur Ajit Pawar Group News : बिद्रीच्या राजकारणात आगामी राजकीय भविष्याची पोळी भाजून घेण्यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे.
Bidri Sugar Factory Election
Bidri Sugar Factory ElectionSarkarnama
Published on
Updated on

kolhapur News : विधानसभेची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणात वेगळी भूमिका डोळ्यांसमोर ठेवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचा गुरुवारी (ता. २ नोव्हेंबर) वेगळाच नूर पाहायला मिळाला. थोडंसं जुळवून घेत माजी आमदार के. पी. पाटील यांच्या दिलजमाईने ‘बिद्री’च्या राजकारणात चमत्कार घडवून आणला आहे. काल-परवा एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असणारे हे दोघे बिद्री कारखाना निवडणुकीच्या अर्ज छाननीत मात्र मांडीला-मांडी लावून बसले होते. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसांत मात्र नेमकं बिनसणार की जुळवून घेणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. (Bidri Sugar Factory Election A. Y. Patil and K. P. Patil came together)

दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या (बिद्री) निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील तीन विधानसभा आणि चार तालुक्यांतील वातावरण ढवळून निघाले आहे. मागील निवडणुकीत मेव्हुणे-पाहुणे माजी आमदार के. पी. पाटील ए. वाय. पाटील एकत्र असलेले यंदा मात्र परस्पर विरोधी भूमिका घेताना दिसत आहेत. या दोघांमधील वाद अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. दोघांची मने आणि मते वेगवेगळी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. बिद्रीच्या राजकारणात आगामी राजकीय भविष्याची पोळी भाजून घेण्यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे. त्यामुळे या निवडणुकीला तितकेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bidri Sugar Factory Election
Maratha Reservation : मराठा समाजाची दिवाळी गोड होणार?; सत्ताधारी आमदाराचे महत्त्वपूर्ण विधान

एकीकडे बिद्रीच्या राजकारणात असे चित्र असताना गुरुवारी मात्र माजी आमदार के. पी. पाटील व ए. वाय. पाटील हे अर्ज छाननीच्या दिवशी मांडीला मांडी लावून बसले आहेत, असे फोटो व्हायरल झाले. बिद्री किंवा विधानसभा हे ध्येय डोळ्यांसमोर घेऊन वाटचाल करणारे ए. वाय. पाटील हे के. पी. पाटील यांच्याबरोबर बसलेले दिसल्यानंतर कार्यकर्ते मात्र बुचकळ्यात पडले आहेत. बिद्रीच्या राजकारणात हे दोघे पुन्हा एकत्र येणार की काय, अशी चर्चा पंचक्रोशीत आहे. मात्र, आगामी काळच हे दोघे एकत्र असणार की नाही, हे सांगणार आहे.

दोघेही अजित पवारांसोबत

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ए. वाय. पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेले. के. पी. पाटील यांनी ‘वेट आणि वॉच’ची भूमिका स्वीकारत जवळपास महिनाभरानंतर अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. सध्या दोघेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे या दोघांच्या वादावर बिद्रीच्या निवडणुकीत मध्यमार्ग निघण्याची शक्यता आहे, अशीही चर्चा आहे.

Bidri Sugar Factory Election
Maratha-Dhangar Reservation : ‘माधवं’नंतर महाराष्ट्रात ‘मध’चा प्रयोग; जरांगेंच्या भूमिकेमुळे धनगर समाजाच्या मागणीला बळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com