'साखरेच्या भावातील कडवडपणा साखर उद्योगासाठी अडचणीचा'

माजी खासदार व कारखान्याचे संस्थापक यशवंतराव गडाख ( Yashwantrao Gadakh ) यांनी साखर उद्योग व ऊस शेती यावर विचार मांडले.
Yashvantrao Gadakh
Yashvantrao GadakhVinayak Darandale
Published on
Updated on

सोनई (अहमदनगर) : मुळा साखर कारखान्याचे 44 व्या ऊस गळीत हंगाम आजपासून सुरू झाला. या हंगामाचे उद्घाटन माजी खासदार व कारखान्याचे संस्थापक यशवंतराव गडाख यांनी केले. या प्रसंगी त्यांनी साखर उद्योग व ऊस शेती यावर विचार मांडले. 'Bitterness in sugar prices a problem for sugar industry'

कार्यक्रमाचे प्रास्तविक 'मुळा'चे उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले यांनी केले. अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी यंदाच्या हंगामात 15 लाख टन गळीताचे उद्दिष्ट असुन याकरीता पूर्ण नियोजन झाले असल्याचे सांगितले. कडुबाळ काटे महाराज, सेवा संस्था अध्यक्ष विश्वास गडाख, क्रांतिकारी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सतीश पालवे, माजी सभापती कारभारी जावळे, कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, जयवंत लिपाने उपस्थित होते. चार सभासद शेतकऱ्यांना पूजन व गव्हाणीत उसाची मोळी टाकण्याचा मान देत नवीन पायंडा सुरु करण्यात आला.

Yashvantrao Gadakh
यशवंतराव गडाख म्हणाले, मिठाच्या खड्यापासून सर्वांनी सावध रहा

यशवंतराव गडाख म्हणाले, "गोड साखरेच्या भावात सध्या कडवटपणा असुन अतिरिक्त उत्पादन व भावाची दोलायमान स्थितीने साखर उद्योगाचे आर्थिक स्थैर्य धोक्यात आले आहे. राज्यातील अनेक कारखान्यास 'एफआरपी'ची रक्कम वेळेवर देणे अवघड झाले आहे, अशा स्थितीत मुळा कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प निश्चितच सभासद हिताचा ठरेल," असे मत गडाख यांनी व्यक्त केले.

Yashvantrao Gadakh
वर्षभरांनी यशवंतराव गडाख यांच्या रंगल्या सवंगड्यांशी गप्पा : घेतला भाजीभाकरीचा अस्वाद

सभासद शेतकरी अनिल पाटील, सुदाम तागड, कडुबाळ काटे व सतीश फुलसौंदर यांच्या हस्ते गव्हाणीची पूजा करुन मान्यवरांसह उसाची मोळी गव्हाणीत टाकून हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. 2019 व 2020 मध्ये सर्वाधिक उसाचे उत्पन्न घेतलेल्या सुरेश जाधव, अजित पाटील, नंदकुमार गोरे, शरद लिपाने, दिलीप गडाख, सुखदेव वाघ, कृष्णाबाई जाधव व भागवत जाधव यांचा सन्मान करण्यात आला.

Yashvantrao Gadakh
यशवंतराव गडाख यांनी नेत्यांना फटकारले ! म्हणाले, जिल्हा बॅंक राजकीय धुडगूस घालण्याची संस्था नाही

मुळा कारखाना व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या जागृकतेमुळे सर्व संस्था सुस्थितीत आहेत. परिणामी तोच अर्थकारणाचा पाया ठरत आहे. शेतकऱ्यांना मानकरी म्हणून सुरू केलेला पायंडा कौतुकास्पद आहे.

- सुदाम तागड, कांदा व्यापारी, सोनई

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com