आता खरी रंगत येणार.. कोथरूडचे कार्यकर्ते कोल्हापूरात पोहोचले!

कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीमुळे राजकारण चांगलेच तापले आहे.
Chandrakant Patil
Chandrakant Patilsarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप (Bjp) आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) या निवडणुकीसाठी जोर लावला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या पुण्यातील कोथरुड मतदार संघातील कार्यकर्त्यांची मोठी फौज कोल्हापुरच्या मैदानत उतरवली आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला.

Chandrakant Patil
चंद्रकांतदादांच्या तीन लाख कार्यकर्त्यांवरून मुश्रीफ अन् घाटगेंचं भांडण!

मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांत पाटील म्हणाले तीन लाख लोक प्रचाराला आणणार आहे. येथे तीन लाख मतदार आहेत. त्यामुळे तीन लाख लोक येथे येवून काय करणार? त्यापेक्षा युक्रेनाला पाठवा, निदाण त्या बिचाऱ्यांना मदत तरी होईल, असा टोला मुश्रीफ यांनी पाटील यांना लगावला. भाजपने बाहेरचे लोक आणून कोल्हापूरचा अभिमान दुखावला, असा हल्लाबोलही त्यांनी केला. त्यावर नवाब मलिक यांच्यासाठी कागलमध्ये मोर्चा काढताना कोल्हापूरचा अभिमान दुखावला नव्हता का, असा खोचक सवाल भाजप जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे यांनी केली. या आरोप-प्रत्यारोपांमुळे कोल्हापूरचे राजकारण रंगले आहे. महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव (Jayshree Jadhav) तर भाजपकडून सत्यजित कदम निवडणूक रिंगणात आहेत.

कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी कोथरुड मतदार संघातल्या कार्यकर्त्यांची फौज कोल्हापूरात दाखल झाली आहे. कोल्हापूरचे दादा पुण्यात आले तेव्हा कोथरुडमध्ये कोल्हापूरच्या यंत्रणेकडून प्रचार केला होता. आता त्याच्या अगदी उलट चित्र आहे. पुण्यातून गेलेले कार्यकर्ते कोल्हापूरात थेट घरोघरी जात प्रचार करत आहेत. लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना भाजपला मतदान करा, असे आवाहन करत आहेत.

Chandrakant Patil
पवारांनी कधी गिळले हे शिवसेनेला सुद्धा कळले नाही!

...म्हणून भाजपचे नेतृत्व कार्यकर्त्यांना पाठवते

कोथरुडमधून कोल्हापूरला प्रचाराला गेलेले पुनीत जोशी म्हणाले, भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. भाजपचा जो कार्यकर्ता असतो तो एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणि एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रचारासाठी जात असतो. कार्यकर्ते हे फक्त निवडणुकीसाठी जात नसतात, तर हे कार्यकर्त्यांसाठी ट्रेनिंग असते. वेगवेगळ्या शहरातील परिस्थिती आणि तेथील समस्या समजाव्या यासाठी भाजपचे नेतृत्व वेगवेगळ्या राज्यातील आणि शहरातील कार्यकर्त्यांना पाठवत असतात. त्याच प्रमाणे आम्ही कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी आलो आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com