
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील भाजपचे जिल्हाध्यक्ष कोण होणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र यापूर्वी नियुक्त दीड वर्षांपूर्वीच झाल्याने आहे ते जिल्हाध्यक्ष पद कायम ठेवण्यात आले आहे. कोल्हापूर करवीरचे जिल्हाध्यक्ष पद हे नाथाजी पाटील तर हातकणंगलेचे जिल्हाध्यक्ष पद जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांचे कायम करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष पद बदलाच्या चर्चेना ब्रेक मिळाला आहे. नाथाजी हे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गाव भागातीलच आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष पदाची निवड होणार होती. सध्या कोल्हापूर शहराला महानगरध्यक्ष म्हणून विजय जाधव, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष म्हणून राजवर्धन नाईक निंबाळकर आणि तिसरे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील पदावर आहेत. निंबाळकर आणि पाटील हे गेल्या दीड वर्षांपूर्वीच त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तीच कायम ठेवण्यात आली आहे.
कोल्हापूरच्या सह पालकमंत्री आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी तंबाखू संघाचे अध्यक्ष संजय पाटील, माजी नगरसेविका रूपारानी निकम, माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या देखील मुलाखती घेतल्या होत्या.
राजकीय चित्र पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिरोळ विधानसभा मतदारसंघातील चेहरा जिल्हाध्यक्ष पदासाठी कायम ठेवत, भाजप विस्तारासाठी मोठी संधी दिली आहे. हातकणंगलेचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर हे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम पाहिले आहे. या निवडणुकीत शिरोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांच्याकडे भाजपचे उमेदवार म्हणून पाहिले जात होते.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल आवाडे यांच्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे नाथाजी पाटील यांनी देखील या विधानसभा निवडणुकीत महायुतीतील सर्व उमेदवारांच्या प्रचारात आग्रही सहभाग घेतला. कार्यकर्ता सदस्य नोंदणीत जवळपास जिल्ह्याचे टार्गेट त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाल्याची माहिती देखील आहे.
कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ काल कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी भाजपच्या कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यांची मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीनंतर बोलताना माधुरी मिसाळ यांनी बोलताना, भारतीय जनता पक्षाचे काम ज्याने दहा वर्षांपेक्षा अधिक केले आहे, अशा कार्यकर्त्यालाच पक्षाचे जिल्हाध्यक्ष केले जाईल, असे स्पष्ट केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.