अहमदनगर - कर्जतला कुकडी प्रकल्पातून पाणी मिळावे यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकऱ्यांकडून जिवेमारण्याची धमकी दिली जात आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, अशा आशयाचे निवेदन माजी मंत्री राम शिंदे व जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली सचिन पोटरे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहे. ( BJP district general secretary threatened by NCP workers )
निवेदनात म्हंटले आहे की, सचिन पोटरे हे भाजपचे काम करत असताना विरोधक या नात्याने सातत्याने आमदार रोहित पवार यांच्या चुकीच्या धोरणांवर व राजकीय भुमिकांवर टीका करतात. तसेच माजी मंत्री राम शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात मंजूर केलेल्या व सद्य स्थितीत अपूर्ण असलेल्या विकास कामांबद्दल पक्षातर्फे भुमिका मांडत असतात. त्यामुळे धांडेवाडी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे हे गुंड प्रवृत्तीच्या व अतिगंभीर गुन्हे दाखल असलेल्या कार्यकर्त्यांना पुढे घालुन सातत्याने मोबाईलवर हॉटसअॅप वर व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समोर आल्यावर देखील जिवे मारण्याच्या धमक्या देतात.
या आधीही बहिरोबावाडी येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी दीपक रामदास यादव व सुधीर रामदास यादव यांनी मला फेसबुक व्हॉटसअॅप व प्रत्येकाक्षात जिवे मारण्याची धमकी देवुन सोशल मीडियावर माझी बदनामी केली. म्हणुन कर्जत पोलिस ठाण्यात सचिन पोटरे यांनी तक्रार दिली होती. राजकीय दबाव असल्याने त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. याउलट 9 मार्चला कर्जत येथे कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या विजेच्या व उसाच्या प्रश्नावर माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात सचिन पोटरे यांनी त्यांच्या भाषणात आमदार रोहित पवार यांच्या आई व वडील यांच्यावर अपशब्द वापरले म्हणुन खोटी फिर्याद दिली.
कर्जत पोलिस ठाण्यातच अतिगंभीर गुन्हे दाखल असलेल्याशिवाजी जालिंदर गुलमे ( बारडगाव द.), दीपक रामदास यादव ( बहिरोबावाडी), सुधीर रामदास यादव राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बापू अरुण काळे, संदीप पोपट गावडे आदी काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना बरोबर घेऊन पोलिस ठाण्यात सचिन पोटरे व राशीन येथील ज्येष्ठ नेते अल्लाउदीन काझी यांच्या नावाने निवेदनाच्या नावाखाली डायरेक्ट धमकीचे पत्र दिले. ते माझे भाषण हे सोशल मीडियावर व्हॉयरल आहे. त्यात मी आमदार रोहित पवार यांच्या आई व वडिलांच्याबाबत काहीच बोललो नाही.
आमदार रोहित पवार यांनी आपल्या अशा गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे न राहता त्यांना योग्य ती समज दयावी. कायदा हा सर्वांसाठी समान असतो. आणि आपल्या मतदार संघातही लोकशाही पध्दतीने राजकारण आणि समाजकारण झाले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून माझ्या जिवीताला धोका निर्माण झाला असुन या संबंधित कार्यकर्त्यांवर प्रशासनाने 15 दिवसांच्या आतमध्ये ताबडतोब तडीपाराचे प्रस्ताव सादर करावेत. जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. आमच्या जिवीताला धोखा निर्माण झाला असुन आमचे काही बरेवाईट झाल्यास संबंधित राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना जबाबदार धरण्यात यावे व त्यासाठी आम्हाला आपल्याकडून संरक्षण मिळावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी दिलीप भालसिंग, शोएब काझी, शेखर फरमरे, पप्पूशेट दोधाड, गणेश पालवे, सुनील काळे आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.