Sharad Pawar On BJP : ...म्हणून मोदींना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही; पवारांचा वर्मावर घाव

Kolhapur NCP Sabha : नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेंचा शरद पवारांनी घेतला समाचार
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : कायम शेतकरीविरोधी निर्णय घेणारे, देशातली महिलांची इज्जत सांभाळू न शकणारे, सत्तेसाठी केंद्रीय यंत्रणांचा सर्रासपणे गैरवापर करणाऱ्या भाजपला सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही, अशा कडक शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. कोल्हापूरच्या निर्धार सभेत पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचाही समाचार घेतला. पवारांनी केलेली जहरी टीका भाजपच्या जिव्हारी लागण्याची शक्यता असल्याने राज्यात रजकीय वतावरण तापणार आहे. (Latest Political News)

"शेकऱ्यांना घामचा पैसा मिळू लगला की सरकार चुकीचा निर्णय घेत आहे. त्यांचा उत्पादन खर्च निघाला पाहिजे. त्यासाठी आपला कांदा जगभरात गेला पाहिजे. मात्र मोदींनी उलटाच निर्णय घेतला. ४० टक्के शुल्क लावले आणि निर्यातीवर मर्यादा आणली. परिणामी राज्यभर शेतकऱ्यांनी आंदोलने केले मात्र राज्य आणि केंद्र या शेतकऱ्यांकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही", अशी टीका शरद पवारांनी भाजपवर केली.

केंद्राने राज्यातील शेतकऱ्यांच्या काद्याला २४१० असा विक्रमी दर दिला. तो दर पवारांनीही दिला नव्हता, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली होती. यावर शिंदेंचा समाचार घेताना पवार म्हणाले, "नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करणे हा उपाय होऊ शकत नाही. माझ्या काळात कधीही अशी वेळ आली होती. मी शेतकरी हिताचीच भूमिका घेतली. त्यावेळी कधीही ४० टक्के निर्यात शुल्क लावले नव्हते", असा पलटवार केला.

Sharad Pawar
Hasan Mushrif & Sharad Pawar News : कोल्हापूरची शरद पवारांची सभा मुश्रीफांनी पाहिली? सोशल मीडियावर 'स्क्रिनशॉट' व्हायरल

भाजपचा समाचार घेतना ते कसे शेतकरीविरोधी आहेत याचा एक किस्साच पवारांनी सांगितला. "माझ्या कृषिमंत्रीकाळात कांद्याच्या किमीत वाढल्या होत्या. त्यावेळी भाजपवाले संसदेत कांद्याच्या माळा घालून आले होते. अध्यक्षांनी विचारले की हा काय प्रकार आहे. त्यावेळी मी निर्यातीवर ठाम राहिलो. आता शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळत आहे. तो कसा वाढेल, यासाठीच प्रयत्न करणार असल्याचे ठणकावून सांगितले. मग तुम्ही कांद्याचा माळा घाला किंवा कवड्याच्या माळा घाला, मला काही फरक पडत नाही. त्यानंतर कुणीही तोंड उघडले नाही", असे पवारांनी सांगताच सभेत एकच हशा पिकला.

पवारांनी साखर निर्यातबंदीकडेही लक्ष वेधताना मोदी सरकारने शेतकऱ्यांना कधी नव्हे इतका अपमान केल्याचे सांगितले. "सप्टेंबरननंतर साखर निर्यात होणार नाही. त्यामुळे शतेकऱ्यांना परिणाम भोगावे लागणार आहे. याचा सर्वात जास्त फटका कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीत शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागते. वर्षेभर ते ऊन, वारा, पावसात बसावे लागले तरी मोदी सरकार त्यांच्याकडे पाहत नव्हते. एवढा मोठा अपमान शेतकऱ्यांचा आतापर्यंत कुणी केला नाही. तो भाजप करत आहे.

Sharad Pawar
Samadhan Awtade News : महाविकास आघाडीने रोखलेला निधी कसा मिळवला ते समाधान आवताडेंनीच सांगितलं

मणिपूर पेटते ठेवणाऱ्या, महिलांची इज्जत सांभाळता न येणाऱ्या, देशातील बेरोजगारी वाढवणाऱ्या, केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापर करणाऱ्या, शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजपला सत्तेतून खेचणार असल्याचा निर्धार यावेळी शरद पवारांनी केला. राज्यासह देशात घडणाऱ्या या घटना २०२४ मध्ये लक्षात ठेवा आणि तरुणांना संधी द्या, असेही सांगायला पवार विसरले नाहीत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com