Hasan Mushrif & Sharad Pawar News : कोल्हापूरची शरद पवारांची सभा मुश्रीफांनी पाहिली? सोशल मीडियावर 'स्क्रिनशॉट' व्हायरल

Kolhapur Political News : शरद पवारांनी कोल्हापूरच्या सभेतून हसन मुश्रीफांचा चांगलाच समाचार घेतला.
Hasan Mushrif & Sharad Pawar
Hasan Mushrif & Sharad PawarSarkarnama

Kolhapur : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवार हे पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी पुन्हा कंबर कसली आहे. याचवेळी त्यांनी अजित पवार गटात गेलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात सभांचा धडाका लावला आहे. सर्वात आधी छगन भुजबळांचा येवला, धनंजय मुंडेंच्या बीडनंतर आता शुक्रवारी तिसरी सभा हसन मुश्रीफांच्या कोल्हापुरात झाली.

आजपर्यंत पवारांच्या प्रत्येक कोल्हापूर दौरा किंवा तेथील सभेत मुश्रीफ पहिल्यांदा हजर असायचे. पण राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासून पहिल्यांदाच त्यांच्याशिवाय सभा पार पडली. मात्र, तरीदेखील पवारांची सभा मुश्रीफांनी ऑनलाईन पाहिल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Hasan Mushrif & Sharad Pawar
Hasan Mushrif on Sharad Pawar : हे चाळीस वर्षात पहिल्यांदाच : पवारांच्या कोल्हापूर सभेवर मुश्रीफ भावूक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ‘स्वाभिमान सभा’कोल्हापूरच्या दसरा चौकात पार पडत आहे. या सभेत बोलताना पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्यामुळे ही सभा हा चर्चेचा विषय असला तरी, पवारांची सभा मुश्रीफ लाईव्ह पाहत असल्याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

शरद पवार यांनी कोल्हापूरच्या सभेत अजित पवार(Ajit Pawar) गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ले चढवले. पण हीच सभा हसन मुश्रीफ फेसबुकच्या माध्यमातून पाहत होते का असा सवाल उपस्थित केला आहे. त्याचा स्क्रिनशॉट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

Hasan Mushrif & Sharad Pawar
Samadhan Awtade News : महाविकास आघाडीने रोखलेला निधी कसा मिळवला ते समाधान आवताडेंनीच सांगितलं

राष्ट्रवादीत 1999 पासून प्रवेश केल्यापासून ते आतापर्यंत शरद पवार यांचा असा कोणताच दौरा नसेल, ज्याला मुश्रीफ उपस्थित नसतील. पण या चाळीस वर्षात पहिल्यांदाच मुश्रीफ हे पवार यांच्या सभेत नाहीत. सत्तेत सहभागी झाल्यानंतरही मुश्रीफ हे पवार आमचे वडीलधारे आहेत, असं सांगतात. पण आता प्रत्यक्षात पवार यांची सभा कोल्हापुरात होत असताना मुश्रीफ नाहीत, असं म्हणता येणार नाही. कारण मुश्रीफांनी त्यांच्या सभेला ऑनलाईन उपस्थिती लावल्याची बोलले जात आहे.

पवार मुश्रीफांवर काय म्हणाले...?

शरद पवारांनी कोल्हापूरच्या सभेतून हसन मुश्रीफां(Hasan Mushrif)चा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, राज्याच्या राजकारणातील काही नेत्यांना काही दिवसांपूर्वी ईडीच्या नोटिशींचा दम दिला. त्याला काही लोकांनी तोंड दिले, पण काही लोकांनी भूमिका बदलली. कोल्हापूर हे शूरांचे गाव आहे, ही नगरी आणि कोल्हापूरचा इतिहास हा शूरांचा आहे. ईडीची नोटीस आली तर त्याला सामोरे जाण्याची ताकद काही लोकं दाखवतील अशी कल्पना माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाची होती. पण चित्र वेगळंच घडलं.

Hasan Mushrif & Sharad Pawar
Sharad Pawar On Mushrif : कोल्हापुरात जाऊन पवारांनी मुश्रीफांचा हिशेब चुकता केला; म्हणाले, '' ईडीच्या नोटिशीला सामोरे जाण्याची ताकद...''

ते म्हणाले, काही लोकांच्या घरी सीबीआयचे लोकं गेले,आयकर विभागाचे लोकही गेले. मला असं वाटलं की, त्यांनी काही काळ आमच्यासोबत काम केले, काहीतरी स्वाभिमान असेल पण नाही असे पवार म्हणाले. घरातल्या महिलांनी सांगितले, की ज्याप्रकारे आमच्यावर तुम्ही हल्ले करताय, टीका करताय, धाडी टाकतायत, त्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला. त्याला आमची तयारी आहे. ही एक भगिनी म्हणू शकते. पण त्या कुटुंबाचा जो प्रमुख आहे त्याने म्हटलेलं मी काही ऐकले नाही असाही हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com