शिवसेना संपविण्यासाठी भाजपकडून शिंदे गटाचा वापर... शशिकांत शिंदे

शशिकांत शिंदे Shashikant Shinde म्हणाले, मुंबई Mumbai महाराष्ट्रापासून Mahrashtra वेगळी होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. इतर राज्यातील मुख्यमंत्री Other states CM येऊन आपल्याकडे येणारे उद्योग घेऊन जात आहेत.
Shashikant Shinde, Eknath Shinde
Shashikant Shinde, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

सातारा : शिवसेना संपविण्यासाठी शिंदे गटाचा हत्यार म्हणून भाजपने वापर केला आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी त्यांची ही रणनिती आहे. पण शिवसेनेला जेवढे डिवचले जाईल, तेवढी सर्वसामान्य जनता शिवसेनेला साथ देणार आहे. शिवसेनेच्या पाठीशी खासदार शरद पवार असल्याने भाजपची खरी अडचण झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

आमदार शशिकांत शिंदे यांनी आज राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही घेतलेल्या भूमिकेमुळे लंम्पीने मृत्यू झालेल्या जनावरांच्या मालकांना सरसकट भरपाईचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. तसेच पोलिस भरतीत पदवीधर युवकांवर अन्याय होऊ नये, म्हणून सरकारने शासन निर्णय बदलावा, यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.

Shashikant Shinde, Eknath Shinde
यापुढे जावळीत अधिक लक्ष देणार : शशीकांत शिंदे

मुंबई महापालिका निवडणुकीविषयी बोलताना ते म्हणाले, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. इतर राज्यातील मुख्यमंत्री येऊन आपल्या राज्यात येणारे उद्योग घेऊन जात आहेत. महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी बुलेट ट्रेन आणली असावी. शिवसेनेच्या निमित्ताने खच्चीकरण करण्याचा भाजपचा उद्देश आहे. शिवसेना संपविण्यासाठी भाजपने शिंदे गटाचा हत्यार म्हणून वापर केला आहे.

Shashikant Shinde, Eknath Shinde
नवा वाद पेटणार? ठाकरेंच्या चिन्हांवरही शिंदे गटाचा दावा

यातून मुंबई महापालिका ताब्यात घेण्याची भाजपची रणनिती आहे. पण कितीही राजकारण करून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न झाला तरी जेवढे डिवचाल तेवढा सामान्य माणूस शिवसेनेला साथ देणार आहे. शिवसेनेचे तुकडे करण्यात पवारांचा हात असल्याचा आरोप होत आहे. या आरोपाचे खंडण करून आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, शिवसेनेच्या पाठीशी खासदार शरद पवार असल्याने भाजपची खरी अडचण झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com