नवा वाद पेटणार? ठाकरेंच्या चिन्हांवरही शिंदे गटाचा दावा

Thackeray-Shinde Politics| ठाकरे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य, धगधगती मशाल, अशा तीन चिन्हांचाही पर्याय आयोगाकडे सादर करण्यात आला आहे.
Thackeray-Shinde Politics|
Thackeray-Shinde Politics|
Published on: 
Updated on: 

Thackeray-Shinde Politics मुंबई : निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाचे चिन्ह गोठवल्यानंतर काल शिवसेनेकडून तीन नवी चिन्हे आणि नव्या नावांचा पर्याय देण्यात आला. त्यानंतर आज शिंंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हे सादर करण्यात आली आहेत. यात त्रिशुळ, गदा आणि उगवता सुर्य, अशी चिन्हांचा पर्याय देण्यात आला आहे. शिंदे गटानेही ठाकरे गटाच्या चिन्हांवर दावा केल्यामुळे आता नवा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

आयोगाने शिवसेना नाव गोठवल्यावर शिवसेनेकडून आमच्या गटाला ''शिवसेना बाळासाहेब ठाकरे'' असे नाव द्यावे, अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली. तसेच ठाकरे गटाकडून आयोगाला तीन संभावित नावे सुचवण्यात आली आहेत. यात शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि तिसरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन नावांचा समावेश आहे. याशिवाय, त्रिशूळ, उगवता सूर्य, धगधगती मशाल, अशा तीन चिन्हांचाही पर्याय ठाकरे गटाकडून आयोगाकडे सादर करण्यात आला आहे.

Thackeray-Shinde Politics|
सत्ता गेली, पक्षाचं नाव आणि चिन्हही गेलं, आता पुढं काय ?

त्यानंतर आता शिंदे गटाकडूनही आयोगाकडे चिन्हे सादर करण्यात आली आहेत. यात, त्रिशुळ, गदा आणि उगवता सुर्य, अशी चिन्हे सादर केली आहेत. पण आता यावरुनही शिंदे-ठाकरे संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरेंनी दिलेल्या मशाल आणि उगवता सुर्य या चिन्हांचा पर्याय शिंदे गटाकडूनही देण्यात आला आहे. आयोगाने दोन्ही गटांना आज दुपारपर्यंतचा वेळ दिला होता. ठाकरेंनी काल चिन्हे आणि नावे सादर केल्यानंतर आज शिंद गटानेही चिन्हे सादर केली आहेत. पण त्यातली दोन चिन्हे ही ठाकरेंनी सादर केलेलीच चिन्हे म्हणेज त्रिशुळ आणि उगवता सुर्य या चिन्हावर शिंदे गटाने दावा केल्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com