Maratha Reservation: मराठा आरक्षण कधी मिळणार; चंद्रकांतदादांनी सांगितली डेडलाईन!

Chandrakant Patil News: मराठा मागास असल्याचा अहवाल आल्याशिवाय अधिवेशन बोलवता येणार नाही.
Chandrakant Patil News
Chandrakant Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur: मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होत असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरक्षण कधी मिळणार, याबाबत मोठं विधान केले आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी चंद्रकांत पाटील आज (रविवारी) पंढरपुरात आले होते. यावेळी मराठा आरक्षणाला अजून किती दिवस लागतील, याबाबाबत त्यांनी माहिती दिली.

'साडेबारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात मराठा समाजाचा मागसलेपणाचा डाटा गोळा करायला वेळ लागणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आणखी एक वर्षांचा कालावधी लागू शकतो,' असे चंद्रकांत पाटलांनी सांगितले.

Chandrakant Patil News
Meera Manjhi: मोदींसोबत 'चाय पे चर्चा' करणाऱ्या कोण आहेत मीरा मांझी?

"प्रत्येक गोष्ट व्हायला वेळ लागतो. २०१४ ते २०१९ काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न मी जवळून हाताळला होता. त्यावेळी मागासवर्ग आयोगाला अहवाल द्यायला एक वर्षाचा कालावधी लागला होता. त्यामुळे तो अहवाल हायकोर्टात टिकला. पण सुप्रीम कोर्टात हायकोर्टाप्रमाणे प्रभावीपणे बाजू मांडता न आल्याने अहवाल टिकला नाही, अशी कबुलीही चंद्रकांतदादांनी दिली.

सध्या साडेबारा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राला तीन कोटी मराठा समाजाची संख्या असल्याने त्याचा डाटा गोळा करायला वेळ लागेल. कदाचित एक वर्ष वेळ लागू शकतो. पण आधी सर्वेक्षण झाल्याने कमी वेळात ही प्रक्रिया होईल. मराठा मागास असल्याचा अहवाल आल्याशिवाय अधिवेशन बोलवता येणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किमान ४५ जागा मिळतील. मी हे हवेत बोलत नाही. विरोधी गटाला केवळ तीनच जागा मिळतील. तेवढ्या तर मिळायला हव्यात, असे चंदकांतदादा म्हणाले. राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. तथापि राज्यातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाचा निर्णय अद्याप झालेला नाही. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बसून लवकरच उमेदवारीचा निर्णय घेतील, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrakant Patil News
Meera Manjhi: मीरा मांझींना दुहेरी आनंद; मोदींनी चहा प्यायला अन् जिल्हाधिकाऱ्यांनी आयुष्यमान कार्ड घरी आणून दिलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com