महाडिकांच्या 'त्या 'वादग्रस्त वक्तव्यावर फडणवीसांनी शेजारी बसून दिलं उत्तर...

भाजपचे नेते धनंजय महाडिक यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात त्यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने वातावरण तापले होते.
Devendra Fadnavis, Dhananjay Mahadik
Devendra Fadnavis, Dhananjay MahadikSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : भाजपचे नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात त्यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने वातावरण तापले होते. त्यांच्या या वक्तव्याविरोधात अनेकांनी संताप व्यक्त केला. त्यावर काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी आपल्या वक्तव्याची मोडतोड करून राजकीय षड्‍यंत्र रचले, असं स्पष्टीकरण महाडिकांनी दिलं होतं. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कोल्हापूरात (Kolhapur) पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांना या वक्तव्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आला होता. महिलांविषयीची वक्तव्य व इतर कारणांमुळे 'पार्टी विथ डिफरन्स' ही भाजपची (BJP) ओळख बदली आहे का, असं विचारलं असता फडणवीस म्हणाले, आमची कुठलीही ओळख बदललेली नाही. एखाद्या गोष्टीचा विपर्यास अनेकदा केला जातो. निवडणूक काळात तो अधिक मोठ्या प्रमाणात होतो. तसाच विपर्यास झाला आहे. भाजप आपल्या तत्वांवर, नीतींवर कायम आहे. म्हणून जनता आमच्यासोबत आहे. देशातील जनताही आमच्यासोबत आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केली.

Devendra Fadnavis, Dhananjay Mahadik
राज्यात राष्ट्रपती राजवट ही भाजपची अधिकृत मागणी नाही : फडणवीसांनी केलं स्पष्ट

काय म्हणाले होते महाडिक?

काँग्रसचे लोक येतील आणि तुम्हाला सांगतील आम्ही एक महिला उभी केली आहे. ती बिचारी आहे. तुम्ही सगळ्या महिला आहात तर तिला मतदान करा. मला सांगा तुमचा पती एखादं प्लंबिंग काम करत असेल तुम्हाला ते जमणार आहे का? तुमचा पती इलेक्ट्रिशियन असेल तुम्हाला ते काम जमणार आहे का ? ज्याचं काम त्यानं करायचं असतं, असे वक्तव्य महाडिक यांनी केले होते.

त्यानंतर धनंजय महाडिक यांनी एका परिपत्रकाच्या माध्यमातुन आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले होते. कोल्हापूर उत्तरची निवडणूक बिनविरोध होणार अशी वल्गना करणाऱ्यांना भाजपने सडेतोड आव्हान दिले. भाजपला मिळणारा प्रतिसाद पाहून कॉंग्रेस नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली. काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या वक्तव्याची मोडतोड करून राजकीय षड्‍यंत्र रचले. भागीरथी संस्थेच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांत हजारो महिलांना न्याय दिला. महिलांचा सन्मान आणि आदर करण्याची महाडिक घराण्याची परंपरा आहे. स्वप्नातही आपल्याकडून कोणत्याही महिलेचा कधीच अवमान होणार नाही.

Devendra Fadnavis, Dhananjay Mahadik
नाना कदम जिंकणार; फडणवीसांनी सांगितली कोल्हापूरची 'पोलिटिकल केमिस्ट्री'

भाजपचा 107 वा आमदार कोल्हापूरातून

महाविकास आघाडी सरकारने एकही काम कोल्हापूर साठी केलेले नाही. आम्हीच केलेली कामं दाखवत आहेत. जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला विजय मिळेल. भाजपचे 107 वे आमदार म्हणून सत्यजित कदम निवडून येतील. पंढरपुरला पांडूरंगाचा आशीर्वाद मिळाला आहे. आता आई अंबाबाईचा आशीर्वाद मिळेल. कोल्हापूरमध्ये दहशतीचं वातावरण आहे. बारा तारखेला काय करायचं, हे लोकांचं ठरलं आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com