कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) आमनेसामने आले आहेत. या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. कोल्हापूर उत्तरची लढत पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील (Satej Patil) आणि भाजपचे नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी प्रतिष्ठेची केली आहे. यातच महाडिक यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यावरून संतापाची लाट निर्माण झाली आहे. याचा भाजपला फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
धनंजय महाडिक यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात त्यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 'साम' या वृत्तवाहिनेने दिलेल्या वृत्तानुसार, महाडिक यांनी या महिलांचा अपमान केल्याचे समोर या व्हिडिओतून आले आहे. प्रचारादरम्यान त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पती करेल ते पत्नी करू शकेल का, असे विधान केले आहे. यामुळे आता कोल्हापुरातील राजकारण तापले आहे. कोल्हापुरात आज या वक्तव्याचा निषेध म्हणून काळे ड्रेस आणि काळी साडी परिधान करून महिलांकडून आंदोलन केले जाणार आहे. कावळा नाका परिसरात हे आंदोलन होणार आहे.
महाडिक काय म्हणाले?
काँग्रसचे लोक येतील आणि तुम्हाला सांगतील आम्ही एक महिला उभी केली आहे. ती बिचारी आहे. तुम्ही सगळ्या महिला आहात तर तिला मतदान करा. मला सांगा तुमचा पती एखादं प्लंबिंग काम करत असेल तुम्हाला ते जमणार आहे का? तुमचा पती इलेक्ट्रिशियन असेल तुम्हाला ते काम जमणार आहे का ? ज्याचं काम त्यानं करायचं असतं, असे वक्तव्य महाडिक यांनी केले आहे.
काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्यूमुळे ही जागा रिक्त झाली आहे. येथून त्यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) मैदानात उतरल्या आहेत. जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना मैदानात उतरवले आहे. कोल्हापूर उत्तरच्या मैदानात एकूण 15 उमेदवार आहेत. पोटनिवडणुकीचे मतदान 12 एप्रिलला होणार असून, निकाल 16 एप्रिलला लागणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी महसूल विभागाच्या 2 हजार 200 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचबरोबर मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.