पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर रामदेवबाबांचा पारा चढला अन् समोरच्याचे आई-बाप काढले!

पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला असून, यावरू रामदेवाबाबांची पारा चढला.
Ramdev Baba
Ramdev Baba Sarkarnama

नवी दिल्ली : योगगुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी पेट्रोेल 30 रुपये लिटर आणि एलपीजी सिलिंडर 400 रुपयांना सरकारने द्यावा, अशी सूचना काही दिवसांपूर्वी केली होती. आता पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका देशात उडाला आहे. याबाबत रामदेवबाबांना विचारणा करताच आज ते भडकले. त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांनाच थेट धमकी दिली. (Petrol Diesel price hike News)

हरियानात एका कार्यक्रमाला रामदेवबाबांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत विचारणा करुन त्यांच्या विधानाची आठवण पत्रकारांनी करुन दिली. यावर रामदेबाबा चांगलेच भडकले. त्यांनी पत्रकाराला धमकी दिली. ते म्हणाले की, हो मी आधी बोललो होतो. आता तू काय करशील? तू जर पुन्हा विचारशील, तुझ्यासाठी चांगले ठरणार नाही. तू एका चांगल्या आई-बापाचा मुलगा असशील, त्यामुळे असे प्रश्न विचारू नकोस.

Ramdev Baba
अफगाणिस्तान, श्रीलंका, नेपाळ अन् पाकिस्तानपेक्षा भारतात पेट्रोल महाग

सुमारे चार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील 10 दिवसांत 9 वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 6.40 रुपयांनी महागले आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 101.81 रुपये झाला असून, डिझेलचा दर 93.07 रुपये आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 84 पैसे वाढ करण्यात आली आहे. यामुळे मुंबईत डिझेलच्या दराने पुन्हा शंभरी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 116.72 रुपये आणि डिझेलचा दर 100.94 रुपये आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 12 ते 25 रुपयांपर्यंत वाढ होईल, असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे.

Ramdev Baba
मोदी सरकारनं पेट्रोल मागच्या वर्षी स्वस्त केलं पण आता दहाच दिवसांत त्यापेक्षा जास्त महागलं

रशियाने युक्रेनवर पुकारलेल्या युद्धाचे चटके आता सगळ्यांनाच बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. खनिज तेलाचा भाव आता प्रतिबॅरल 110 डॉलरवर गेला आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. असे असतानाही उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर सुमारे चार महिने स्थिर होते. या निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात आता वाढ सुरू झाली आहे. याआधी सीएनजीचा दरात सातत्याने वाढ करण्यात आली असून, यानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचा नंबर लागला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com