Jaykumar Gore: बारामतीतून सांगावा आला की सगळे माझ्या विरोधात एकत्र येणार; मीच पुन्हा आमदार होणार!

BJP MLA Jaykumar Gore on Sharad Pawar: माझ्या विरोधात जनतेला न पटणारे खोटे नेरेटीव्ह सेट केले तरी खटाव-माणची जनता मी १५ वर्षात काय केले आहे हे त्यांना सांगण्याची गरज नाही.
Jaykumar Gore
Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Maan BJP News: विधानसभा निवडणूक जवळ आल्या की साडेचार वर्षे गायब असलेल्या माण -खटावमधील अनेकांची भाद्रपद महिन्याप्रमाणे तारांबळ उडाली आहे. त्या सगळ्यांना फलटण, बारामतीतून चावी मिळाली आहे. विरोधकांकडे विकासकामे, पाणीप्रश्नावर निवडणूक लढविण्याचा कोणताच अजेंडा आणि व्हिजन नाही. त्यांचा तो आवाकाच नसल्याने जयकुमारच पुन्हा आमदार होतील, असे ते खासगीत सांगत आहेत. शरद पवारांनी (Sharad Pawar) माण-खटावसाठी काय केले हे एकदा जाहीरपणे सांगावे, असे जाहीर आव्हान आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी दिले आहे.

दहिवडी (ता. माण) येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात आमदार गोरे बोलत होते. ते म्हणाले, "समाजात द्वेष पसरवून, चुकीचे आणि विघातक नेरेटीव्ह सेट करुन काही लोक राजकारण करतात. शरद पवारांचा त्यात हातखंडा आहे. पवार माण-खटावमध्ये कधी उरमोडी, जिहे कठापूरच्या पाणी पूजनाला आले नाहीत. त्यांना या भागात एमआयडीसी व्हावी, टेंभूचे पाणी यावे असे कधीच वाटले नाही. त्यांनी या भागात एकही मोठे काम केले नाही हे त्यांचेच कार्यकर्ते सांगतात,"

Jaykumar Gore
Nana Patole: 'फडणवीस हरिश्चंद्र आहेत का? खोटा नरेटिव्ह कोणी सेट केला?' नाना पटोले संतापले

"विधानसभा निवडणूक आली की त्यांनी अनेकांना चावी दिली आहे. त्यात वरकुट्याचे दोन गडी, एक कुणासोबतही फोटो काढून व्हायरल करणारा, एक नवी गाडी घेऊन पेढे वाटत फिरणारा, निमसोडचा कुणीतरी लढावे लागेल असे सांगितले म्हणून फोटो काढत फिरणारा, एक अडगळीत पडलेला लोधवड्याचा आणि एक दाढी मिशा नसणारा असे अनेक गडी ‘बेगानी शादी मे दिवाना अब्दुल्ला...’ झाले आहेत. या सर्वांकडे निवडणूक लढण्याचा उद्देशच नाही. त्यांना फक्त माझा पराभव करायचा आहे. त्यांनी १५ वर्षात जनतेसाठी काहीच केले नाही. त्यांची माझ्यावर बोलायची पात्रताच नाही," असे गोरे म्हणाले.

"कुणा एकाच्यात धमक नसल्याने बारामतीचा सांगावा आला की हे सगळे माझ्या विरोधात एक होणार आहेत. त्यांनी कितीही प्रयत्न केले, माझ्या विरोधात जनतेला न पटणारे खोटे नेरेटीव्ह सेट केले तरी खटाव-माणची जनता मी १५ वर्षात काय केले आहे हे चांगलेच जाणते. आपण गावोगावच्या विकासकामांबरोबर उरमोडी, जिहेकठापूरचे पाणी आणले. आताही जिहेकठापूरचे पाणी लवकरच आंधळी धरण आणि माणगंगा नदीत सोडतोय. उत्तर माणच्या ३२ गावांना पाणी देतोय. मायणी, कुकुडवाडसह ४२ गावांच्या योजनेचे भूमिपूजन करतोय. माणमधील उर्वरित २७ गावे जिहेकठापूरच्या लाभक्षेत्रात घेत असल्याने पाणीप्रश्नावरील माझी ही शेवटची निवडणूक असेल असेही आमदार गोरेंनी सांगितले.

आमच्या सरकारने मराठा बांधवांना १० टक्के टिकणारे आरक्षण दिले आहे. सध्याच्या पोलिस भरतीत ते लागू आहे. मात्र आरक्षण दिलेच नाही असे नेरेटीव्ह पवार आणि त्यांचे बगलबच्चे सेट करत आहेत. संविधान बदलणार असेही खोटे नेरेटीव्ह त्यांनीच सेट केले होते. दलित आणि मुस्लिम बांधवांनाही चुकीचे सांगून समाजात द्वेष पसरविण्याचे काम ते करतात, असा घणाघात आमदार गोरेंनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com