Praveen Darekar : प्रवीण दरेकरांना पडली नरेंद्र पाटलांच्या 'बीएमडब्ल्यू'ची भुरळ; मारली राईड

Praveen Darekar News : दरेकरांनी केलेल्या बाईक राईडची चागंलीच चर्चा रंगली
Praveen Darekar
Praveen Darekar Sarkarnama

कराड : भाजप नेते प्रवीण दरेकर यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांच्या बाईकने भुरळ घातली आहे. प्रवीण दरेकर यांनी चक्क नरेंद्र पाटील यांच्या बीएमडब्ल्यू या बाईकची राईड मारली.

नरेंद्र पाटील यांच्या या बीएमडब्ल्यू बाईकची प्रवीण दरेकर यांनी राईड मारत सविस्तर माहिती घेतली. झालं असं की, कराड येथे बाईकवरून फिरणारे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि भाजप (BJP) नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांची भेट झाली.

Praveen Darekar
Ramdas Athawale : आठवलेंचा कवाडेंना आक्षेप; म्हणाले, मुख्यमंत्री शिंदेनी असं करायला नको होतं !

यावेळी नरेंद्र पाटील यांच्या बीएमडब्ल्यू बाईकने दरेकरांना भुरळच घातली. यावेळी त्यांनी स्वत: बाईकवर एक चक्कर मारत गाडीचा अंदाज घेतला. तसेच त्यांच्या या बीएमडब्ल्यू बाईकची माहीतीही घेतली.

नरेंद्र पाटील कराडहून मुंबईला बाईकवरुन निघाले होते. यावेळी कराडमध्ये प्रवीण दरेकर हे नरेंद्र पाटील यांना भेटले. यावेळी दरेकरांनी स्वत: त्यांच्या बाईकची राईड मारली आणि बाईक चालवण्याचा आनंद घेतला.

Praveen Darekar
Satara : साखर कारखानदारीला उभारी द्या : शिवेंद्रराजेंनी घेतली केंद्रीय उद्योग मंत्र्यांची भेट

दरम्यान, यावेळी प्रवीण दरेकर यांचा मुलगा देखील त्यांच्या बरोबर होता. यावेळी मुलाला विचारल की, 'घ्यायची का अशी बाईक तुला', यावर एकच हशा पिकला. तर त्यांनी केलेल्या या बाईक राईडची मात्र चागंलीच चर्चा रंगली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com