Ramdas Athawale : आठवलेंचा कवाडेंना आक्षेप; म्हणाले, मुख्यमंत्री शिंदेनी असं करायला नको होतं !

Ramdas Athawale : पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत युतीची घोषणा झाली आहे.
Ramdas Athavale
Ramdas AthavaleSarkarnama

Ramdas Athawale : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीत युतीची चर्चा सुरू असताना, पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षात युती झाली. राज्यातील राजकारणाला नवीन वळण देणारी घटना घडली आहे . यावर बोलतांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athavale) यांनी घणाघाती टिका केली आहे.

आठवले म्हणाले, मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath shinde) आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रपरिषद घेत याबाबतची घोषणा केली. “जोगेंद्र कवाडे यांना घेतांना एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी चर्चा करायला हवी होती. त्यांना घेण्याची गरज नव्हती” असे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे. रामदास आठवले आज दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

Ramdas Athavale
Dattatray Bharane : मीही पवारांचा पठ्ठ्या....: दत्तात्रेय भरणेंनी हर्षवर्धन पाटलांना ललकारले

त्यासोबतच केंद्र व राज्य सरकारने देशातील भूमीहीन कुटुंबांना प्रत्येकी पाच एकर जमीन द्यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. अशी योजना अमलात आणण्याबाबत ठराव करण्यात आला आहे, अशी माहितीही आठवलेंनी दिली. त्यामुळे आगामी काळात देशातील भूमीहीन कुटुंबाना पाच एकर जमीन मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबई प्रमाणे एसआरए ची योजना राज्यातील इतर प्रमुख शहरातही  ही योजना राबवावी, अशी मागणी आठवलेंनी केली आहे.

Ramdas Athavale
महापुरुषांची मापे काढायची आपली लायकी आहेत का; सर्वपक्षीय वाचाळवीरांना जाणकरांचा सवाल !

जैन धार्मियांचे आस्थास्थान असलेल्या सम्मेद शिखरजी तीर्थ स्थळाला केंद्र आणि झारखंड सरकारने पर्यटनस्थळ घोषित केल्याचा निर्णय मागे घेवून तीर्थस्थळ घोषीत करण्यात यावे, या मागणीसाठी सकल जैन समाजाच्या वतीने आंदोलन करण्यातआले होते. तर आता सम्मेद शिखरच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सम्मेद शिखरला पर्यटन स्थळ बनवण्याच्या निर्णयाला केंद्राने तत्काळ स्थगिती दिली आहे. जैन समाजाच्या मागणीनंतर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत आहे. जैन समाजाच्या पाठीशी नेहमी उभं राहणार असेही आठवले यावेळी म्हणाले.

यादरम्यान, येत्या केही दिवसात राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. विस्तार करताना आमच्या पक्षाला एक मंत्री पद मिळणार आहे. माध्यमांशी बोलतांना आठवले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com