उपाध्यक्षपदाची खुर्ची संजय पाटलांच्या काकांना मिळणार की सत्यजित देशमुखांच्या?

सांगली जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलामुळे भाजपचे प्रमुख नेते नाराज
MP sanjay Patil
MP sanjay PatilSarkarnama
Published on
Updated on

सांगली : सांगली जिल्हा परिषदेचे पदाधिकारी बदलाला प्रदेश भाजपकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतिपदासाठीची शर्यत खुली झाली आहे. आरग गटातील सदस्या सरिता कोरबू यांना नेत्यांनी आधीच शब्द दिला असल्याने त्यांचा अध्यक्षपदावर मजबूत दावा आहे. पलूस येथील अश्‍विनी पाटील, ॲड. शांता कनुंजे याही दावा करण्याची शक्यता आहे. उपाध्यक्ष आणि सभापतिपदासाठी मात्र शर्यत रंगणार आहे. बदलाच्या या निर्णयामुळे काही प्रमुख नेते नाराज असल्याने त्यांची भूमिका काय असेल, याकडे लक्ष असेल. (BJP leaders Upset over change of office bearers in Sangli Zilla Parishad)

पदाधिकारी बदलाचे सूत्रधार खासदार संजय पाटील आहेत. त्यांचे काका डी. के. पाटील यांचे नाव अर्थातच उपाध्यक्षपदासाठी अग्रक्रमाने चर्चेत राहू शकेल. त्याचवेळी शिराळ्याचे नेते सत्यजीत देशमुख यांनी कोणतेही महत्वाचे पद न घेता काँग्रेसमधून भाजप प्रवेश केला आहे, त्यांचे काका संपतराव देशमुख यांच्यासाठी ते उपाध्यक्षपद मागू शकतात. त्यामुळे कुणाचे काका उपाध्यक्ष होणार, याकडे लक्ष असणार आहे.

MP sanjay Patil
छापेमारीमुळे काही मोठी नावे अडचणीत आल्यानेच ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला

प्राजक्ता कोरे यांना अध्यक्षपद देताना सरिता कोरबू प्रमुख स्पर्धक होत्या. तेव्हा त्यांची समजूत घातली होती. सव्वा वर्षानंतर संधी देण्याचा शब्द त्यांना दिला होता. मात्र, महापालिकेत महापौर निवडीत फटका बसल्याने भाजप सावध झाली आणि जिल्हा परिषदेतील बदल लांबणीवर पडला. तो टळला, असे वाटत असतानाच आता बदलाचे आदेश आले आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांना अवघे चार महिने मिळणार आहेत. आचारसंहितेचा काळही त्यातच असेल. त्यामुळे हे पद विकास कामापेक्षा राजकीय महत्वाकांक्षा आणि दिलेला शब्द पुरा करण्याचा प्रयत्न करणे, याअर्थाने महत्वाचे ठरले आहे.

MP sanjay Patil
विरोधी पक्षनेतेपदासाठी मेंढे यांचे नाव आठ दिवसांपूर्वीच निश्चित झाले होते

भाजपमध्ये उद्‍भवलेली संभाव्य बंडाळी शमवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी बदलाला मान्यता दिल्याची चर्चा आहे. या घडामोडीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शिवसेना ही महाविकास आघाडी येथे काय भूमिका घेते, हे महत्वाचे असेल. अवघ्या चार महिन्यांसाठी राजकीय कौशल्य वापरण्याची शक्यता कमी असून, सदस्यही या बदलात आडवा पाय घालण्याच्या मानसिकतेत नाहीत, असे दोन्ही गटांकडून खासगीत सांगितले जात आहे.

शिवसेना भाजपसोबत जाणार का?

भाजपच्या सत्तेला शिवसेना, घोरपडे समर्थक, रयत आघाडी, स्वाभिमानी आघाडीचा टेकू आहे. राज्यात सत्तांतरानंतर आणि येथे तीन वर्षांनंतर बदल करताना शिवसेनेने पद घेतले नाही, मात्र विरोधही केला नाही. घोरपडे गट, रयतकडे महत्वाची खाती आहेत. आता बदल करताना बिनविरोधसाठी भाजपचा प्रयत्न राहील. तरीही, समर्थक पक्ष, गटांना सोबत घेऊन सभापतीपद दिले जाणार का? रयत आघाडी भाजपचाच भाग झाली आहे, मात्र आमदार अनिल बाबर, अजितराव घोरपडे शिवसेनेत आहेत, त्यांना भाजपसोबत सत्तेत जाणे सोयीस्कर ठरेल का, हा कळीचा मुद्दा असेल. सभापतिपदासाठी अरुण बालटे, सुरेंद्र वाळवेकर, मनोज मुंडगनूर, रेश्‍मा साळुंखे, वंदना गायकवाड, मोहन रणदिवे, स्नेहलता जाधव, रेखा बागेळी, मंगल नामद यांच्यासह रयतचे निजाम मुलाणी, सुरेखा जाधव; घोरपडे समर्थक संगीता पाटील याही दावा करतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com