Dharashiv News : मतदारसंघातील विकासकामांवरून भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राणाजगजितसिंह पाटलांनी ओमराजेंना सुनावलं आहे.
"ओमराजेंनी त्यांचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना भेटायला पाहिजे. एखादा मोठा प्रकल्प कशा पद्धतीने केला जातो, याची शिकवण ठाकरे पिता-पुत्रांकडून त्यांनी घ्यायला हरकत नाही. ती शिकवणी झाल्यानंतर त्यांच्याशी बोलू" असा खोचक सल्ला राणाजगजितसिंह यांनी दिला आहे.
"आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विकास प्रकल्प व मॉडेल हे फक्त संगणक व पीपीटी पुरते मर्यादित असतात. प्रत्यक्षात काही काम होत नाही," अशी टीका काही दिवसांपूर्वीच खासदार ओमराजे निंबाळकरांनी राणाजगजितसिंह यांच्यावर केली होती. त्याला राणाजगजितसिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील विविध प्रकल्प व योजनांसाठी गेल्या पंधरा महिन्यांमध्ये तब्बल पाच हजार कोटींचा निधी उपलब्ध केल्याबद्दल राणाजगजितसिंह पाटील यांचा यूथ फोरमच्या वतीने आमदार शहाजी पाटील यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार नुकताच करण्यात आला.
"ठाकरे सरकारच्या काळात रखडलेल्या जिल्ह्याच्या सगळ्या महत्त्वपूर्ण बाबींना वेग आला असून, आपल्या सर्वांचे प्रेम व आशीर्वादामुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलल्याखेरीज राहणार नाही," असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.