Shoumika Mahadik News : शौमिका महाडिकांच्या पोस्टरची कोल्हापुरात चर्चा; 'अब दिल्ली दूर नही...'

Kolhapur Politics : गोकुळच्या निमित्ताने केलेले दौरे हे लोकसभा निवडणुकीची तयारी होती का?
Shoumika Mahadik News
Shoumika Mahadik News Sarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर

Kolhapur Political News : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. कोल्हापूर लोकसभा, विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतंत्र चाचपणी सुरू केली आहे. सर्व शक्यता गृहीत धरूनच सर्वांनी आत्तापासूनच कंबर कसली आहे.

त्यात भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा आणि गोकुळ संचालिका शौमिका महाडिक या भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार की काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कारण त्यांचा एक पोस्टर सध्या जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरतोय.

Shoumika Mahadik News
Sharad Pawar News : राष्ट्रवादीकडून अतुल बेनके जुन्नर विधानसभा लढविणार का? शरद पवार म्हणाले...

निमित्त होतं गणेश विसर्जन मिरवणुकीचं. भाजपचे कोल्हापूर शहरातील पदाधिकारी कुलदीप गायकवाड यांच्या बूथवरील फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गणेश विसर्जन मार्गावरील महाद्वार रोड परिसरात कोल्हापूर बंगाली सुवर्ण कारागीर असोसिएशन यांच्या वतीने फलक लावण्यात आला होता.

या फलकावर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक आणि कुलदीप गायकवाड यांचा फोटो होता; पण शौमिका महाडिक यांच्या फोटोच्या वर " दिल्ली अब दूर नही" अशी टॅगलाइन लावली होती. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या नजरा या फलकावर होत्या. सध्या या फलकाची चर्चा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सुरू आहे.

वरिष्ठांनी आदेश दिल्यास ...

काही दिवसांपूर्वी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली होती. आतापर्यंतच्या चर्चेत जे विद्यमान खासदार आहेत, त्याच गटाला लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता आहे. जर वरिष्ठांना आम्हाला आदेश दिल्यास लोकसभेसाठी आम्ही सर्वतोपरी सज्ज आहोत, असं सूचक विधान खासदार महाडिक यांनी केले होते.

गोकुळच्या निमित्ताने जिल्हाभर दौरे

गोकुळ दूध संघाची वार्षिक सभा होण्यापूर्वी विरोधकांच्या कारभाराचा भांडाफोड सभासदांच्या समोर करण्यासाठी गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी जिल्हाभर दौरे केले होते. या दौऱ्यात गोकुळच्या सत्ताधाऱ्यांबरोबरच आमदार सतेज पाटील गटावर कडाडून टीका केली होती. गोकुळच्या निमित्ताने केलेले दौरे हे लोकसभा निवडणुकीची तयारी होती का? असा सवालदेखील आता उपस्थित होत आहे

Shoumika Mahadik News
Ramraje Nimbalkar News : रामराजे विरोधकांवर भडकले; म्हणाले, "आमच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न कराल, तर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com