

Mangalvedha News: मंगळवेढा शहराच्या विकासासाठी आम्ही कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊ शकतो. येत्या काही दिवसांत आम्हाला इतर विरोधी पक्ष देखील पाठिंबा देण्यास तयार आहेत आणि देतील अशी गुगली भाजप आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांनी टाकली. त्यामुळे कोणता विरोधी पक्ष पाठिंबा देतो याची शहरातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. पण आवताडेंनी टाकलेल्या गुगलीमुळे शहरातील राजकीय वातावरण ऐन थंडीत गरम झाले.
नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांनी आज शहरात पदयात्रा काढली. पदयात्रेच्या समारोपानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुप्रिया जगताप, अजित जगताप, बशीर बागवान, गौरीशंकर बुरकुल, संभाजी घुले, महादेव जाधव, पांडुरंग नाईकवाडी, प्रवीण खवतोडे, बबलू सुतार, आदी उपस्थित होते
त्यावेळी बोलताना आमदार आवताडे म्हणाले, जनतेला विकास हवा आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देऊ शकतात. तसा निधी त्यांनी मंगळवेढासाठी यापूर्वी दिला आहे. हे मतदारांच्या लक्षात आल्यामुळे मतदार आमच्या पाठीशी आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुप्रिया जगताप या आमच्या पक्षाच्या सक्रिय सदस्य आहेत.शहराच्या विकासासाठी राजकीय जोडे बाजूला देऊन कुठल्याही पक्षांना एकत्र घेऊन प्रयत्न करीत आहोत
दामाजीच्या निवडणुकीत अजित जगताप यांनी विरोध केल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, राजकीय वैमनस्य नसते. विचारांची देवाण-घेवाण होत असते. दामाजीला ते माझ्याबरोबर नसले तरी विधानसभेला माझी भूमिका त्यांना योग्य वाटल्यामुळे ते माझ्याबरोबर होते. त्यामुळे राजकारणातील घटना आणि क्रम वेगळे असतात. त्यामुळे येत्या काळात आमच्या दोघांचं ठरलं आहे.
मंगळवेढा शहराच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचे ठरले आहे. त्यामुळे सर्वांची लाडकी बहीण सुप्रिया जगताप यांना ह्या मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. यावेळी अजित जगताप म्हणाले की, शहराच्या विकासासाठी सर्वात जास्त निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे हे देऊ शकतात.
विनाकारण आमच्याविरोधात चुकीची माहिती देऊन विरोधक दिशाभूल करत आहेत. आम्ही टक्केवारी घेतली नाही, असं मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो. तसं त्यांनी पण सिद्ध करून दाखवावं,असं आवाहनही जगताप यांनी यावेळी विरोधकांना दिलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.