Uddhav Thackeray: गळती थांबता थांबेना, त्यात शिवसैनिकांना मिळवून दिली काँग्रेसची उमेदवारी; संतापलेल्या ठाकरेंनी विभागप्रमुखाला अद्दलच घडवली

Shivsena UBT News: राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महाविकास आघाडी आहे. जिल्ह्यातील अनेक पालिकेत महाविकास आघाडी कायम असली तरी यवतमाळ पालिका निवडणुकीत शिवसेना स्वंत्रत लढत आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Yavatmal News: नगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत आहे. येत्या 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संतोष ढवळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामुळे शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे.

उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेच्या काही इच्छुकांना काँग्रेसमध्ये पाठवले. त्यांना उमेदवारी मिळवून दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिवसेनेचा आक्रमक चेहरा अशी ओळख असलेले ढवळे आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा जिल्ह्यात रंगल्या आहेत.

यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संतोष ढवळे यांच्या हकालपट्टीचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. पालिका निवडणुकीत ते पक्षविरोधी कारवाया करून काँग्रेसला सहकार्य करत असल्याने कारवाई केल्याची माहिती संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी दिली.

राज्यात शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महाविकास आघाडी आहे. जिल्ह्यातील अनेक पालिकेत महाविकास आघाडी कायम असली तरी यवतमाळ पालिका निवडणुकीत शिवसेना स्वंत्रत लढत आहे. असे असतानाही संतोष ढवळे यांनी काही शिवसैनिकांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवून दिली.

Uddhav Thackeray
Balraje Pawar Arrest : अटकेनंतर बाळराजे पवारांची कोठडीत रवानगी: गेवराई राड्यातील एक एकेकाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांची धडपड

या उमेदवारांसाठी ते शिवसेनेच्या विरोधात प्रचार करीत आहे. त्यामुळे पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी दिली. यवतमाळ पालिका निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. २० डिसेंबरला मतदान होणार आहे. अशास्थितीत मतदारांना मतदार यादीच्या चिठ्ठ्या काही पक्षाकडून वाटप केल्या जात आहे. मात्र, हे वाटप करीत असताना पक्षाकडून फोटो असलेल्या मतदार चिठ्ठी दिल्या जात आहे.

या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. संतोष ढवळे हे शिवसेनेशी अनेक वर्षांपासून जोडले आहेत. शिवसेनेतील आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी अनेक राजकीय, सामाजिक आंदोलनात आक्रमकपणे आवाज उठविला होता.

Uddhav Thackeray
Girish Mahajan : नाशिकचे चार मंत्री तपोवनातील कुऱ्हाडीपासून चार हात लांब, सगळे घाव गिरीश महाजनांच्याच उरावर

एका प्रकरणात ढवळे यांनी भाजप नेत्यांवर टीका करताना बक्षीस जाहीर केले होते. त्यामुळे ते राज्यभर चर्चेत आले होते. संघटनेत विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या संतोष ढवळे यांनी विधानसभा निवडणूकही पक्षाच्या चिन्हावर लढविली तर एक वेळा अपक्ष म्हणूनही निवडणूक रिंगणात उतरले होते. पक्षात फूट पडली तेव्हा ते उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com