Loksabha 2024 : "माढ्यातून तिकिट मिळून देणार नाही", रामराजेंच्या इशाऱ्यावर रणजितसिंह निंबाळकर प्रत्युत्तर देत म्हणाले...

Ranjitsingh Naik Nimbalkar VS Ramraje Naik Nimbalkar : "एकीकडे संस्कृतपणा दाखवायचा अन्...", अशी टीकाही खासदारांनी रामराजेंवर केली आहे.
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते, रामराजे नाईक निंबाळकर ( Ramraje Naik Nimbalkar ) आणि माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाही. "रणजितसिंह नाईक निंबाळकरांना माढ्यातून तिकीट मिळून देणार नाही," असा इशारा रामराजे नाईक निंबाळकरांनी गुरूवारी दिला होता. याला रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी ( Ranjitsinh Naik Nimbalkar ) प्रत्युत्तर दिलं आहे.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje vs Ranjitsinh Naik Nimbalkar: दोन निंबाळकरांमधील वाद टोकाला, रामराजेंनी धू धू धुतले

"राष्ट्रवादीत रामराजे नाईक निंबाळकरांना काडीचीही किंमत राहिली नाही. त्यांच्यापेक्षा ज्युनिअर मंडळी मंत्री झाली. पण, त्यांना मंत्रीपद मिळालं नाही. ज्यांना त्यांच्या पक्षात स्थान नाही, ते भाजपाची भूमिका ठरवायला निघालेत, याचं आश्चर्यं वाटतं," अशा शब्दांत रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी रामराजे नाईक निंबाळकरांची खिल्ली उडवली आहे. ते फलटणध्ये बोलत होते.

( राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

"...तरीसुद्धा मी फलटण तालुक्यातून मताधिक्य घेतो"

"रामराजे नाईक निंबाळकर नेहमी माझ्यावर टीका करतात, हे मला नवीन नाही. एकीकडे संस्कृतपणा दाखवायचा दुसरीकडे गुंडांना बरोबर घेऊन दहशतीचा वापर करायचा. तरीसुद्धा मी फलटण तालुक्यातून मताधिक्य घेतो. त्यावरही ते मला अपघाताने खासदार झाले, असे म्हणतात. ही त्यांची जुनी परंपरा आहे. रामराजे नाईक निंबाळकरांना माढा मतदारसंघात महत्त्वच राहिलेले नाही. माझ्या विकास कामांचा परिणाम येणाऱ्या लोकसभेनंतर रामराजे नाईक निंबाळकरांच्या राजकारणावर व कारकिर्दीवर झालेला दिसून येईल," असा इशारा रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी दिला.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Ranjitsinh Naik-Nimbalkar : 'मी शब्द पाळणारा खासदार...' उदाहरण देऊनच सांगितले निंबाळकरांनी...

"रामराजे नाईक निंबाळकर नेहमी खोटे बोलतात"

"मी परमेश्वर सोडले, तर कुणाचे पाय धरत नाही. अजित पवार हे महाराष्ट्रातील सन्माननीय नेते आहेत. वेगवेगळ्या कामांच्या विषयावर व राजकीय भूमिकांवर चर्चा करण्यासाठी आमची नेहमी भेट होते. मात्र, मी अजित पवारांचे पाय धरतो, हे त्याचे म्हणणे धादांत खोटे आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे असे नेहमी खोटे बोलतात," अशी टीका रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केली.

"पक्ष देईल, तो आदेश पाळणार"

"मी भाजपाचा कार्यकर्ता असून या मतदारसंघात पक्षाचे काम करत आहे. पण, उद्या जर पक्षाने या मतदारसंघात नवीन चेहरा द्यायचे ठरवले, तर मी मागे सांगितल्याप्रमाणे पक्ष जो आदेश देईल, तो मी तंतोतंत पाळणार आहे. तसेच, माझे कार्यकर्तेही तो आदेश पाळतील," असं रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी स्पष्ट केलं.

"महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणार"

"माढा मतदारसंघात मला वेगळी तयारी करण्याची गरज नाही. मी निवडून आल्यानंतर जनतेला दिलेले सर्व शब्द पाळले आहेत. मला संधी मिळाली तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्या खासदारांत माझा समावेश होईल," असा विश्वास खासदार निंबाळकर यांनी व्यक्त केला.

"माढा मतदारसंघ हा भाजपाकडे"

"सध्या राज्यात युतीचे सरकार असून, रामराजे नाईक निंबाळकर युतीत आहेत. त्यांना युतीचा फायदा हवा असतो. मात्र, वेळ आले की ते गद्दारी करतात. माढा मतदारसंघ हा भाजपाकडे आहे. ते भाजपाचे पक्षश्रेष्ठी कधी झाले," असा प्रश्न उपस्थित करत खासदार निंबाळकरांनी उपस्थित केला.

Edited By : Akshay Sabale

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Pune University : 'जब वी मेट' नाटकावरून राडा, 'जय श्री राम'चा नारा देत अभाविपकडून ललित कला केंद्राची तोडफोड

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com