Ramraje Naik Nimbalkar News : पक्षादेश आला तर माढ्यातून लढणार; पण, खासदार फलटणच्या वाड्यातलाच होणार...

Satara DCC Bank Meeting सातारा जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर माजी सभापती रामराजे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.
Ramraje Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

Ramraje Naik Nimbalkar News : पक्षाने आदेश दिला तर मी माढा मतदारसंघातून लोकसभा लढण्यास तयार आहे. त्याबाबत खासदार शरद पवार यांचा अंतिम निर्णय घेतील. पण, माढाचा खासदार फलटणच्या वाड्यातील होईल, वाड्याबाहेरचा होणार नाही, असे स्पष्ट मत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्हा बॅंकेच्या नफ्यातून शेतकऱ्यांसाठी विविध तरतूदी करण्यासाठी आज बॅंकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर माजी सभापती रामराजे Ramraje Naik Nimbalkar यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. राष्ट्रवादीकडून NCP माढा लोकसभेसाठी रामराजे यांचे नाव निश्चित मानले जात आहे. पण, रामराजे याला मान्यता देणार का, तसेच शरद पवारांचा दुजोरा मिळणार का, हा प्रश्न राजकिय वर्तूळातून उपस्थित होऊ लागले होते.

रामराजेंना दिल्लीला पाठवण्याची गरज आहे, त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढे हा विषय मांडून मान्य करुन घेतला जाईल, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फलटणच्या कार्यक्रमात जाहीर केले होते.

Ramraje Naik Nimbalkar
Satara News : राज्यपालांचा महाबळेश्‍वर दौरा पुढे ढकलला

यासंदर्भात रामराजेंना विचारले असता ते म्हणाले, पक्षाने आदेश दिला तर मी माढा लोकसभेसाठी लढण्यास तयार आहे. त्यासाठी खासदार शरद पवारांचा निर्णय अंतिम असेल. पण, माढाचा खासदार यावेळेस फलटणच्या वाड्यातीलच होणार आहे. वाड्याबाहेरचा खासदार होणार नाही, असे खोचक उत्तर देत भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अप्रत्यक्ष आव्हानच दिले.

Ramraje Naik Nimbalkar
Phaltan News : माढ्यात भाजपच्या निंबाळकरांविरोधात राष्ट्रवादीकडून 'राम'अस्त्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com