भाजप, राष्ट्रवादीच्या वादात; शिवसेनेचे पारडे झाले जड

तारळे ग्रामपंचायतीत Tarale राष्ट्रवादी काँग्रेस NCP व भाजप BJP यांची निवडणूकपूर्व आघाडी झाली होती. केवळ शिवसेनेला Shivsena सत्तेपासून दूर ठेवणे या एकाच भूमिकेतून दोघांनी ताकद पणाला लावली होती.
Shambhuraj Desai, Satyajit Patankar
Shambhuraj Desai, Satyajit Patankarsarkarnama
Published on
Updated on

तारळे (पाटण) : सत्तेच्या सारीपाटावरून तारळे ग्रामपंचायतीत सुरू झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या सत्ताधारी आघाडीतील धुसफुसीचे पर्यावसन अखेर पक्षांतरात झाले. भाजप समर्थक म्हणून निवडून आलेले विद्यमान उपसरपंच सुधा पवेकर व दोन ग्रामपंचायत सदस्यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ग्रामपंचायतीत सेनेचे दहा सदस्य, तर राष्ट्रवादीचे सात सदस्य झाले आहेत. आगामी ग्रामपंचायत कारभारात त्याचे काय पडसाद उमटतात, याकडे तारळेरांचे लक्ष लागले आहे.

तारळे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक वर्षापूर्वी झाली. आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या सूत्रानुसार राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांची निवडणूकपूर्व आघाडी झाली होती. केवळ शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवणे या एकाच भूमिकेतून दोघांनी ताकद पणाला लावली होती. आघाडीचे काही मोहरे गारद झाले. आघाडीने ठरविलेली गोष्ट साध्य करीत सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात आले. आघाडीने दहा जागांवर विजय मिळवत सत्ता हस्तगत केली होती.

Shambhuraj Desai, Satyajit Patankar
जयंत पाटील हे कौतुक करतायत की टोमणे मारतायात, हेच शंभूराज देसाईंना कळेना!

विजयानंतर सरपंच, उपसरपंचपदांचे कार्यकाल निश्चित केले गेले. दोन्हीकडच्या नेतेमंडळींनी खलबते करून कारभारी निश्चित केले. त्यानुसार निवडी झाल्या. वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहिल्याने सत्ताधारी गटात मतभेद, रुसवे- फुगवे सुरू झाले. सरपंच निवडीला वर्ष होतानाच पदाधिकारी बदलाच्या चर्चेने जोर धरला. मात्र, योग्य तोडगा निघालाच नाही. त्यातून धुसफूस व गैरसमज वाढून त्याचे पर्यावसन पक्षांतरात झाले. विद्यमान उपसरपंच पवेकर व दोन ग्रामपंचायत सदस्य प्रणिल यादव, किरण सोनावले या तिघांनी शिवसेनेत प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला. त्यामुळे ग्रामपंचायतीत सेनेचे दहा सदस्य, तर राष्ट्रवादीचे सात सदस्य झाले आहेत.

Shambhuraj Desai, Satyajit Patankar
Video: आर्थिक निकषांवर आरक्षण देऊन टाका; उदयनराजे भोसले

ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालणार...

तारळे ग्रामपंचायतीत शिवसेना बहुमतात, तर सरपंच असलेली राष्ट्रवादी अल्पमतात आली आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या सत्ता राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. कारण दोन वर्षे सरपंचांवर अविश्वास आणता येत नाही. बहुमत विरुद्ध अल्पमत, सरपंच विरुद्ध उपसरपंच असे राजकीय द्वंद्व रंगण्याबरोबरच शह-काटशहाचे राजकारण होण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालणार, बहुमताच्या आधारे उपसरपंच कारभार चालवणार का, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com