Sangli Lok Sabha 2024: भाजपच्या विद्यमान खासदारांचा पत्ता कट? सांगलीसाठी नवीन पाच नावे समितीकडे...

Sangli Lok Sabha Constituency 2024: विशाल पाटील यांचे चर्चेत असताना उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने काँग्रेसला धक्का दिला.
Vishal Patil-Sanjay Patil
Vishal Patil-Sanjay PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli Political News: सांगली लोकसभेसाठी (Sangli Lok Sabha Constituency 2024) भाजपमध्ये उमेदवारीवरून घोळ सुरूच आहे. विद्यमान खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांना पृथ्वीराज देशमुख यांनी आव्हान दिल्यानंतर आणखी पाच जणांची नावे केंद्रीय निवड समितीकडे पाठविण्यात आली आहेत. यामध्ये आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि प्राजक्ता कोरे यांचा समावेश आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार का? अशी चर्चा सुरू आहे.

लोकसभेच्या निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजणार आहे. राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजप (BJP) उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकही नाव नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये धास्ती वाढली आहे. सांगलीसाठी काँग्रेस, भाजपचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. मात्र, काँग्रेसकडून युवा नेते विशाल पाटील यांचे नाव चर्चेत असताना उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने काँग्रेसला धक्का दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी तयारी केली आहे. मात्र, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी आव्हान दिले आहे. त्यातच आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नावाचीही चर्चा सुरू असताना सांगली लोकसभेसाठी भाजपकडून आणखी पाच नवीन नावे केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी देताना नवीन चेहर्‍याला संधी देऊन धक्का देण्याची शक्यता आहे.

Vishal Patil-Sanjay Patil
Nashik Lok sabha 2024: शांतीगिरी महाराज अन् मुख्यमंत्री शिंदे यांच्यात खलबतं; भेटीचं गुपित काय?

केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आलेल्या यादीमध्ये सांगलीचे आमदार गाडगीळ यांच्यासह विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेच माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, प्राजक्ता कोरे आणि माजी जिल्हाध्यक्ष शिंदे यांचा समावेश आहे. खासदार संजयकाका पाटील आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यापैकी कोणाला उमेदवार मिळणार, याची चर्चा सुरू असताना नवीन नावे गेल्याने इच्छुकांमध्ये आणखी धाकधूक वाढली आहे.

मागील आठवड्यात जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली होती, त्यामध्ये जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी पक्ष जो उमेदवार देईल, त्यास निवडून आणण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वी विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनीही पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे विधान केले होते. त्यांच्या वक्तव्याने भाजपच्या उमेदवारीवर संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नसल्याने दुसर्‍या यादीकडे लक्ष लागले आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com